नगरमधील महिलेची संकेतस्थळावर बदनामी

सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
नगरमधील महिलेची संकेतस्थळावर बदनामी

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

एका संकेतस्थळावर महिलेचे बनावट अकाऊंट तयार करून त्याव्दारे संबंधित महिलेची बदनामी केल्याचा प्रकार रविवारी घडला आहे. नगर शहरात राहणार्‍या पीडित महिलेने याप्रकरणी येथील सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्तीविरूध्द भादंवि कलम 500 सह आयटी अ‍ॅक्ट कलम 66 (सी) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित फिर्यादी महिलेला तिच्या व्हॉट्सअ‍ॅपवर रविवारी एक मेसेज आला. त्या मेसेजवरून पीडितेला आपल्या नावाच्या पुढे ‘कॉलेज गर्ल पुणे’ असे लिहून पाठविले होते. पीडित महिलेला बनावट अकाऊंट तयार केल्याचे समजले. या अकाऊंटवर तिचा व्हॉट्सअ‍ॅप क्रमांकही टाकल्याचे दिसून आले. त्यातून बदनामी केल्याचा प्रकार लक्षात आल्याने पीडिताने रविवारी दुपारी सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी अधिक तपास पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर भोसले करीत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com