
गणेशवाडी |वार्ताहर| Ganeshwadi
नेवासा तालुक्यातील (Newasa) सोनई (Sonai) येथील बाजार पेठेतून एका महिलेच्या गळ्यातील सोन्याची चैन चोरट्याने (Woman Gold Chain) लंपास केल्याची घटना घडल्याने खळबळ उडाली आहे.
पोलीस सुत्रांकडून समजलेल्या माहीतीनुसार, फिर्यादी महीला ही आपल्या राहत्या घरासमोर दि. 6 मार्च रोजी सायंकाळी 7.45 वाजेच्या सुमारास चिकु विकत असतांना एक जण चिकु घेण्याचा बहाणा करत फिर्यादीच्या डोक्यावर मिरची पावडर टाकत गळ्यातील 22 ग्रॅम वजनाची सोन्याची चैन (Gold Chain) बळजबरीने ओरबाडून नेली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
आता धुम स्टाईलने महिलांच्या गळ्यातील सोन्यावर चोरटे (Theft) डल्ला मारु लागल्याने तेही राहत्या घरासमोरच यामुळे महिलांमध्ये मोठे घबराटीचे वातावरण पसरले आहे. सोनई पोलीस ठाण्यात (Sonai Police Station) अज्ञात चोरट्या विरोधात 111/2023 भा. द. वी. कलम 392 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आले आहे. पुढील तपास पो. स. ई राजेंद्र थोरात हे करत आहे.