महिलेला मारहाण करत विनयभंग

उपनगरातील घटना; दोघांविरूध्द गुन्हा
महिलेला मारहाण करत विनयभंग

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

महिलेला मारहाण करत विनयभंग करण्यात आला. अहमदनगर शहरातील एका उपनगरात सोमवारी दुपारी ही घटना घडली. पीडित महिलेने तोफखाना पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून सोनिया शहबाज सय्यद, शहबाज सय्यद (रा. मुंकुदनगर) यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सोमवारी दुपारी फिर्यादी त्यांच्या आईकडे भेटण्यासाठी गेल्या होत्या. त्यावेळी सोनिया व शहबाज यांनी फिर्यादीला शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. शहबाज याने फिर्यादीला धक्का देत त्यांच्याशी गैरवर्तन करून विनयभंग केला. सदर भांडणात फिर्यादीच्या गळ्यातील सहा ग्रॅमचे मंगळसूत्र गहाळ झाले आहे. फिर्यादीचे पती भांडण सोडविण्याठी गेले असता शहबाज याने त्यांना शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. अधिक तपास महिला पोलीस उपनिरीक्षक शुभांगी मोरे करीत आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com