शेत नांगरण्यास विरोध; महिलेला मारहाण, विनयभंग

नगर तालुक्यातील घटना; दोघांविरूध्द गुन्हा
शेत नांगरण्यास विरोध; महिलेला मारहाण, विनयभंग

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

शेत नांगरण्यास विरोध करणार्‍या महिलेचा विनयभंग करत तिला लाकडी दांडा व दगडाने मारहाण केली. नगर तालुक्यातील एका गावात ही घटना घडली. या प्रकरणी नगर तालुका पोलिसांत भावकितील एकासह ट्रॅक्टर चालक नंदु कडूस (पूर्ण नाव माहिती नाही, रा. सारोळा कासार ता. नगर) याच्याविरूध्द विनयभंग, मारहाण आदी कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित महिलेने फिर्याद दिली आहे.

फिर्यादी घरासमोर भांडे घासत असताना आरोपी हे ट्रॅक्टर घेऊन शेतात नांगरणी करण्यासाठी आले होते. त्यावेळी फिर्यादी त्यांना म्हणाली,‘माझा नवरा येईपर्यंत तुम्ही नांगरणी करू नका, अजुन शेती वाटण्या झालेल्या नाहीत’, असे म्हणाल्याचा आरोपींना राग आला. त्यांनी फिर्यादीला शिवीगाळ करत दगड व काठीने मारहाण केली. विनयभंग करत ट्रॅक्टर अंगावर घालीन, अशी धमकी दिली. या मारहाणीत फिर्यादीचे मंगळसूत्र पडुन गहाळ झाले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

Related Stories

No stories found.