महिलेला मारहाण; बंदुकीचा धाक दाखवून धमकावले

सात जणांविरूध्द गुन्हा
महिलेला मारहाण; बंदुकीचा धाक दाखवून धमकावले

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

घरगुती वादाच्या कारणातून महिलेला मारहाण करत बंदुकीचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना बुर्‍हाणनगर (ता. नगर) येथील देवीमंदिराशेजारी घडली. याप्रकरणी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात सात जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आशा सुभाष रोहकले (रा. गुगळे कॉलनी, बुर्‍हाणनगर) यांनी फिर्याद दिली आहे.

आरोपीमध्ये अमोल गंपू घाडगे, कैलास दत्तात्रेय शेलार, सज्ञान पेंटा शेलार, ओंकार कैलास शेलार, हलका सज्ञान शेलार, बंडू भगत (पूर्ण नाव माहिती नाही), पेंटा शेलार (पूर्ण नाव माहिती नाही, सर्व रा. बुर्‍हाणनगर ता. नगर) यांचा समावेश आहे. 22 फेब्रुवारीच्या रात्री बुर्‍हाणनगर येथील देवी मंदिराच्या शेजारी आरोपींनी घरगुती वादाच्या कारणातून हत्याराने फिर्यादीला मारहाण केली. गावठी बंदुकीचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी दिली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. घटनेची माहिती मिळताच भिंगार कॅम्प पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. पुढील तपास पोलीस नाईक बी. पी. गायकवाड करीत आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com