महिलेला मारहाण करीत दीड तोळे, पाच हजारांची रोकड लंपास

रूईछत्तीसी शिवारातील घटना; तिघांवर गुन्हा
महिलेला मारहाण करीत दीड तोळे, पाच हजारांची रोकड लंपास

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

महिलेला कटावणी व रॉडने मारहाण करत दीड तोळे वजनाचे सोन्यांचे दागिने व पाच हजार रुपये रोख रक्कम चोरून नेल्याची घटना मंगळवारी पहाटे नगर तालुक्यातील रूईछत्तीसी शिवारातील वडगाव तांदळी रोडवर घडली. याप्रकरणी बाळकृष्ण नामदेव दरंदले (वय 62) यांनी नगर तालुका पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून तीन चोरट्यांविरूध्द जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सोमवारी रात्री फिर्यादी यांची पत्नी जयश्री व दोन मुली घराच्या खालच्या रूममध्ये व फिर्यादी वरच्या रूममध्ये झोपले होते. मंगळवारी पहाटे दोन ते अडीच वाजेच्या सुमारास तीन चोरट्यांनी फिर्यादी यांच्या घराचा सेफ्टी दरवाजा उचकटून आतील दरवाजाचा कडीकोयंडा तोडला. चोरट्यांनी जयश्री यांच्या हात, पाय व डोक्यात कटावणी, रॉडने मारहाण केली.

त्यांच्या अंगावरील मंगळसूत्र, कर्णफुले, कानवेली असा दीड तोळ्यांचा ऐवज व घरातील पाच हजार रुपयांची रोख रक्कम घेऊन चोरट्यांनी पोबारा केला. यानंतर फिर्यादी यांनी नातेवाईकांना संपर्क केला. नातेवाईक आल्यानंतर त्यांनी नगर तालुका पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली असून अधिक तपास सुरू केला आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com