मजुरीचे पैसे मागितल्याने महिलेला मारहाण

मजुरीचे पैसे मागितल्याने महिलेला मारहाण

राहुरी |प्रतिनिधी| Rahuri

मजुरीचे पैसे मागीतल्याचा राग आल्याने 30 वर्षीय महिलेला शिवीगाळ केली. तसेच लाकडी काठीने मारहाण करून जखमी केल्याची घटना राहुरी शहर हद्दीत घडली आहे.

छाया राहुल जाधव, (रा. मिशन कंपाऊंड, चर्च समोर राहुरी, ता. राहुरी) यांनी राहुरी पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले, दि. 1 सप्टेंबर रोजी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास छाया जाधव या त्यांच्या घरासमोर होत्या. त्या ठिकाणी आरोपी रमेश कावळे हा आला असता छाया जाधव यांनी त्यांच्या आईचे मजुरीचे पैसे आरोपीला मागितले. त्याचा राग आल्याने आरोपी रमेश कावळे याने छाया जाधव यांना शिवीगाळ करून लाकडी काठीने मारहाण केली.

या घटनेत छाया जाधव या जखमी झाल्या असून त्यांच्यावर राहुरी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांनी राहुरी पोलिसांत दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी रमेश धोंडीराम कावळे, राहणार तनपुरे वाडी, ता. राहुरी. याच्या विरोधात गुन्हा रजि. नं. 844/2022 भादंवि कलम 324, 504 प्रमाणे शिवीगाळ व मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक शिवाजी खरात करीत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com