
अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
मुलास शाळेतून घरी घेऊन जात असतांना शिवीगाळ केल्याची विचारणा केल्याच्या रागातून दोन महिलांनी एका महिलेस तिच्या मोपेड गाडीवर ओढून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर सदर महिला व तिच्या पतीला तिघांनी जातीवाचक शिवीगाळ केली. ही घटना शिवाजी नगर कल्याण रोड येथे 9 मार्च रोजी दुपारी साडेबाराच्या सुमारास घडली.
याप्रकरणी फर्याद देण्यात आली आहे. अतिष दिपक टाक, आशिष दिपक टाक, वनिता अतिष टाक स्वाती आशिष टाक (सर्व रा. शिवाजीनगर कल्याण रोड), आयुष आतिष टाक (रा. कल्याण रोड) यांच्याविरूध्द मारहाण व ऍट्रॉसिटी कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी महिला ही तिच्या मुलास शाळेतून घरी घेऊन जात असताना आयुष आतिष टाक याने विनाकारण शिवीगाळ केली. त्याचा जाब विचारला असता, स्वाती आशिष टाक, वनिता आतिष टाक यांनी फिर्यादीस तिच्या मोपेड गाडीवर ओढून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.
मारहाणीत फिर्यादीचा एक दात निखळून गंभीर दुखापत झाली. तसेच अर्वाच्च भाषेत जातीवाचक शिवीगाळ केली. तसेच सिव्ही हॉस्पिटल येथून औषधोपचार घेऊन घरी येत असताना आतिष टाक, दिपक टाक व आशिष टाक यांनी फिर्यादीस व फिर्यादीचा पती मनोज यांना जातीवाचक शिवीगाळ करून दमदाटी केली, असे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास पोलिस करीत आहेत.