पैसे न दिल्याने महिलेला मारहाण

चौघांविरूध्द गुन्हा || उपनगरातील घटना
पैसे न दिल्याने महिलेला मारहाण

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

उपनगरात राहणार्‍या 29 वर्षीय महिलेसोबत लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन करत तिला मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी पीडित महिलेच्या फिर्यादीवरून तोफखाना पोलीस ठाण्यात शरद (पूर्ण नाव, पत्ता माहिती नाही) यांचा मित्र (पूर्ण नाव माहित नाही) आणि अनोळखी दोन ते तीन जणांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुरूवारी शरदच्या मित्राने पीडित महिलेला फोन करून 10 हजारांची मागणी केली. गुरूवारी दिवसभर आरोपी पीडितेकडे पैशांची मागणी करत होता. पीडितेने सायंकाळपर्यत पैसे न दिल्याने त्याने अश्लील बोलण्यास सुरूवात केली. पीडित महिला त्याच्याकडे गेली असता त्याठिकाणी पीडितेला आरोपीने मित्रांच्या मदतीने मारहाण करत तिला लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन केले.

तसेच पीडितला जिवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर पीडितेने पोलिसांना फोन करत माहिती दिली असता आरोपी तेथून पळून गेले. पीडितेने घटनास्थळी आरोपींची दुचाकी पकडून ठेवली होती. तोफखाना पोलीस अधिक तपास करत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com