लोखंडी गजाने महिलेला मारहाण

लोखंडी गजाने महिलेला मारहाण

भिंगारमधील घटना : दोघांविरूध्द गुन्हा

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

लोखंडी गजाने महिलेला मारहाण करत तिच्या घरातील सामानाची तोडफोड केल्याची घटना 31 ऑगस्ट रोजी सायंकाळी भिंगार शहरातील सावतानगरमध्ये घडली. वंदना अविनाश घोडके (रा. सावतानगर, भिंगार) असे मारहाण झालेल्या महिलेचे नाव आहे. त्यांनी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून दोघांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सोनु उर्फ सुनील ज्ञानेश्वर बकरे, बेबी रामचंद्र शिंदे (दोघे रा. पंपिंग स्टेशन, सावतानगर, भिंगार) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. 31 ऑगस्ट रोजी सायंकाळी सोनू उर्फ सुनील बकरे हा दारू पिऊन आला. त्याने वंदना घोडके यांना शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच लोखंडी गजाने डाव्या हाताच्या दंडावर, डोक्यात मारहाण करून जखमी केले. सोनू व बेबी यांनी वंदना घोडके यांच्या घरातील सामानाची तोडफोड करून नुकसान केले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. अधिक तपास पोलीस हवालदार व्ही.आर.गारूडकर करीत आहेत.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com