माहेरी आलेल्या महिलेला सासरच्या मंडळींकडून मारहाण; गुन्हा दाखल

माहेरी आलेल्या महिलेला सासरच्या मंडळींकडून मारहाण; गुन्हा दाखल

सोनई |वार्ताहर| Sonai

माहेरी मोरेचिंचोरे (ता. नेवासा)येथे राहत असलेल्या विवाहित महिलेस शिवीगाळ व लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याप्रकरणी चितेगाव (ता.पैठण) येथील पाच जणावर सोनई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस सूत्रांकडून समजलेल्या माहितीनुसार कावेरी विशाल चव्हाण (वय 24) धंदा- घरकाम, रा. साईनगर, चितेगाव ता. पैठण जि. औरंगाबाद हल्ली रा. मोरेचिंचोरे ता. नेवासा यांनी सोनई पोलीस ठाण्यात फिर्याद दिली की बुधवार दिनांक 30 जुन रोजी रात्री पती विशाल टाबर चव्हाण व सासरकडील लोकांनी नांदावयास चल म्हणाल्यावर त्यास फिर्यादीने नकार दिल्याने फिर्यादीला लाथाबुक्क्यांनी मारहाण करून तू जर आमच्याकडे नांदायला येत नसेल तर तुला जीवे मारून टाकू अशी धमकी दिली.

पती विशाल चव्हाण याने हातातील चाकूने फिर्यादीला मारण्याचा प्रयत्न केला. पण तो हुकला. फिर्यादीची लाथ लागल्याने विशाल चव्हाण खाली पडला. त्याचे हातातील चाकू अंधारात कुठेतरी पडला. डोक्यात गजाने मारून पाठीत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली व शिवीगाळ केली. या फिर्यादीवरून विशाल टाबर चव्हाण, इंदुबाई टाबर चव्हाण, पूजा रमेश शिंदे, सपना अशोक जैन, सावरधा टाबर चव्हाण सर्व रा. साईनगर चितेगाव ता. पैठण जिल्हा औरंगाबाद यांच्यावर भा.दं.वि कलम 143, 147, 148, 149, 324, 323, 504, 506 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक रामचंद्र कर्पे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक एन. आर. तुपे करत आहेत.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com