विनापरवाना किटकनाशकाचे उत्पादन व विक्री; नाशिकच्या कंपनीविरुध्द गुन्हा दाखल

नेवासा कृषि अधिकार्‍यांची फिर्याद
विनापरवाना किटकनाशकाचे उत्पादन व विक्री; नाशिकच्या कंपनीविरुध्द गुन्हा दाखल

नेवासाफाटा |प्रतिनिधी| Newasa Phata

देशांतर्गत वापरासाठी नोंदणीकृत किटकनाशक विनापरवाना उत्पादित व विक्री केल्याप्रकरणी नेवासा पंचायत समिती अधिकार्‍यांच्या फिर्यादीवरुन नाशिकच्या एका कंपनीविरोधात नेवासा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी कील ‘लॅक्टो क्रॉप केअर’ या कंपनीच्या ‘निमराज’ नावाच्या किडींचे नियंत्रण करीत असलेल्या जैविक औषधाचा नमुना पुणे येथील प्रयोगशाळेत चाचणीसाठी पाठविला होता. सदर औषधामध्ये झाडीरेक्टिन 6800 पीपीएम आढळून आल्याने संबंधीत उत्पादित कंपनीविरूध्द नेवासा तालुक्यातील कृषि सेवा केंद्रात विक्री करताना फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

नेवासा पंचायत समितीचे तालुका कृषि अधिकारी प्रताप कोपनर नेवासा तालुक्यातील कृषि केंद्राची तपासणी करत असताना निमराज मे. लेक्टो क्रॉप केअर, मखमलाबाद, लिंक रोड, म्हसरुळ, नाशिक 422004 नावाच्या औषधाबाबत कंपनीने अल्कलॉईड बेस औषध असून यामुळे किडी मरत असल्याचा दावा केलेला आहे. त्यामुळे सदर औषधाबाबत शंका आल्याने 3 मार्च 2023 रोजी निमराज किटकनाशक औषधाचा नमुना घेण्यात अला. सदर नमुन्याबाबतचे बिल घेण्यात आले. त्यानुसार किटकनाशक कायदा 1968 मधील खंड 22(5) मधील तरतुदीनुसार नमुना घेण्यात आला. सदर नमुना पुणे येथील किटकनाशक चाचणी प्रयोगशाळा येथे पाठविण्यात आला होता.

किटकनाशक चाचणी प्रयोगशाळेचे रसायनशास्त्रज्ञ यांचा नमुना विश्लेषण अहवाल प्राप्त झाला. 13.03.2023 नुसार अ‍ॅझॅडिरॅक्टीन हा घटक 0.68% तपासणीनुसार आढळून आला. त्यानुसार या कार्यालयाचे पत्र क्रमांक /कृषि/गुनिनि/110/2023, दिनांक 14 मार्च 2023 नुसार किटकनाशक अधिनियम 1968 व नियम 1971 चे उल्लंघन केलेले असून, संबंधीत उत्पादकाकडे निमराज हे अ‍ॅझॅडिरॅक्टीन (निम उत्पादने) जैविक किडनाशक उत्पादन व विक्री करण्याचा परवाना आहे किंवा कसे? याबाबतचा खुलासा सादर करण्याबाबत पंजीबध्द डाकेने कळविले असता, सदर पत्र, अर्धवट पत्ता असल्याने परत आले, म्हणजे उत्पादनाचा पत्ता चुकीचा देण्यात आलेला आहे. तसेच दिनांक रोजी पॅकिंगवर नमुद ई-मेल द्वारे खुलासा सादर करण्याबाबत कळविले आहे. तथापि संबंधीतांकडून खुलासा प्राप्त झाला नाही.

लेक्टो क्रॉप केअर, मखमलाबाद, लिंक रोड, म्हसरुळ, नाशिक यांनी किटकनाशक अधिनियम 1968 मधील खंड 9 (3) नुसार देशांतर्गत वापरासाठी नोंदणीकृत किटकनाशक विनापरवाना उत्पादित व विक्री करत आहेत. त्यामुळे त्यांचेविरूध्द किटकनाशक अधिनियम 1968 मधील खंड 3 के (1), 3 के (2), 3 के, भारतीय दंड विधा कलम 420, 34 अन्वये शासनातर्फे नेवासा पंचायत समिती कृषी अधिकारी प्रताप कोपनर यांनी फिर्याद दाखल केली. पुढील तपास नेवासा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर थोरात करत आहेत.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com