प्रभाग दोनमध्ये संपूर्ण नालेसफाई न करताच बिले काढण्याचा डाव

नगरसेवकांचा आरोप || ठेकेदाराची आयुक्तांसमोर झाडाझडती
प्रभाग दोनमध्ये संपूर्ण नालेसफाई न करताच बिले काढण्याचा डाव

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

शहरातील सर्व ठिकाणी नालेसफाई झाली असल्याचा कांगावा अधिकारी करीत आहेत. मात्र, प्रभाग दोनमध्ये संपूर्ण नालेसफाई न करता अधिकारी व ठेकेदाराचा संगनमताने बिल काढण्याचा डाव असल्याचा आरोप माजी नगरसेवक निखील वारे, विनीत पाउलबुद्धे यांनी केला. दरम्यान, संबंधित ठेकेदाराची आयुक्तांसमोर झाडाघडती घेतली.

नालेसफाईसाठी संबंधित ठेकेदार व उपअभियंता रोहिदास सातपुते यांच्याकडे तक्रार केल्यानंतर ते बजेट शिल्लक नाही म्हणतात. मग नालेसफाई कशी करायची? असा सवाल वारे यांनी उपस्थित केला. वारे, पाउलबुद्धे यांनी संबंधित ठेकेदाराला आयुक्त डॉ. पंकज जावळे यांच्यासमोर उभे केले. औरंगाबाद रस्त्यावरील सनी पॅलेस ते अभियंता कॉलनीकडे येणारा नाला शंभर मीटर सफाई करण्याचा राहिला आहे.

वारंवार तक्रार करूनही ठेकेदार व अधिकारी दुर्लक्ष करीत आहेत. नालेसफाईचे अर्धवट काम करूनही त्याचे बिल काढण्याचा डाव आहे. नालेसफाई केल्याशिवाय बिले देऊ नयेत, असे वारे म्हणाले. दरम्यान, आयुक्त डॉ. जावळे म्हणाले, संबंधित कामाची संपूर्ण चौकशी करून कार्यवाही करण्यात येईल.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com