तपासणी न करताच तरूणाचा अहवाल आला पॉझिटिव्ह

राहुरी ग्रामीण रूग्णालयाचा जावईशोध; तरूणाला मनःस्ताप, कुटुंब भयभीत
तपासणी न करताच तरूणाचा अहवाल आला पॉझिटिव्ह

राहुरी |प्रतिनिधी| Rahuri

राहुरी कृषी विद्यापीठात करोनाग्रस्त झालेल्या नातेवाईकाला जेवणाचा डबा घेऊन गेलेल्या राहुरी येथील तरूणाचा अहवाल तपासणी न करताच पॉझिटिव्ह आल्याने

या कोविड तपासणी केंद्राचा अनागोंदी कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. त्यामुळे राहुरी ग्रामीण रूग्णालयाच्या जावईशोधामुळे नागरिकांमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटल्या आहेत.

दरम्यान, एवढं करूनही ते थांबेल नाहीत, त्यांनी चक्क त्या तरूणाच्या हातावर शिक्कामोर्तब करून त्याच्या राहुरी येथील घरावरही स्टिकर चिकटवून आपली कामगिरी फत्ते केली. त्यामुळे त्या तरूणासह त्याचे कुटुंबही भयभीत झाले असून परिसरात संताप व्यक्त केला जात आहे.

राहुरी येथील राजवाडा परिसरात राहणारे एक सामाजिक तरूण कार्यकर्ता त्याच्या नातेवाईकांना जेवणाचा डबा देण्यासाठी राहुरी कृषी विद्यापीठातील कोविड तपासणी केंद्रात गेला होता. यावेळी त्याने तपासणीसाठी नाव नोंदणी केली. संबंधित कर्मचार्‍यांनी त्यांना काही वेळाने बोलाविले. मात्र, ते पुन्हा तेथे गेले नाही. त्यांनी कोणत्याही प्रकारची तपासणी केली नाही. किंवा कोणत्याही स्त्रावाचा नमुना दिला नाही.

तसेच त्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास नव्हता. मात्र, अहमदनगर येथील आरटीपीसीआर लॅब येथून आलेल्या तपासणी अहवालात चक्क त्या तरूणाला करोना पॉझिटिव्ह दाखविण्यात आले. तर राहुरी ग्रामीण रूग्णालयाने दिलेल्या अहवालात त्यांना गैरहजर दाखविण्यात आले आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com