श्रीगोंदा |ता. प्रतिनिधी| Shrigonda

अहमदनगर जिल्ह्यात करोनाचा प्रादुर्भाव परत वाढू लागल्याने अहमदनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी केलेल्या आवाहनानुसार

बेलवंडी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संपतराव शिंदे यांनी सोमवारी रस्त्यावर उतरून करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे विनामास्क फिरणार्याच्या विरोधात बेलवंडी पोलिस स्टेशनच्या हद्दीत चिंभळा चौक, बेलवंडी एसटी स्टँड, शिरूर रोड, बेलवंडी फाटा, गव्हाणेवाडी, या ठिकाणी जनजागृती करत धडक कारवाई सुरू केली.

बेलवंडी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संपतराव शिंदे यांनी श्रीगोंदा तालुक्यात वाढलेल्या करोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर बेलवंडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ठीक ठिकाणीं तसेच बस स्थानक परिसर, महाविद्यालये, शाळा परिसरात जनजागृती करत विना मास्क फिरणार्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई केली.

यावेळी शहरात विना मास्क फिरणार्या 100 नागरिकांकडून सुमारे 10 हजार रूपये दंड आकारणी करत त्यांना मास्क, सॅनिटायझर तसेच सोशल डिस्टंन्स ठेवण्याचे आवाहन केले.