प्रेमी युगलाची तासाभराच्या अंतराने आत्महत्या

प्रेमी युगलाची तासाभराच्या अंतराने आत्महत्या

जामखेड |प्रतिनिधी| jamkhed

तालुक्यातील आपटी (Apati) या ठिकाणी एका अल्पवयीन मुलीने आत्महत्या (Suicide by a Minor Girl) केली. त्यानंतर काही तासातच तिच्या प्रियकराने (Lover) देखील गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. बुधवारी दुपारी ही घटना घडली असून याप्रकाराने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. या दोघांनी आत्महत्या (Suicide) का केली, याबाबत अद्याप माहिती समजू शकली नाही.

जामखेड तालुक्यातील (Jamkhed) आपटी या ठिकाणी एका 16 वर्षाच्या मुलीने दुपारी बारा ते एक वाजेच्या दरम्यान आपल्या घरी गळफास (Suicide) घेऊन आत्महत्या केली. ही माहिती याच गावात राहणार्‍या तिच्या 17 वर्षाच्या प्रियकराला (Lover) समजली. आपल्या प्रेयसीने नक्की आत्महत्या (Suicide) केली आहे का ? याची खात्री करण्यासाठी संबंधित प्रियकर (Lover) मुलीच्या घरी गेला. त्यावेळी आपल्या प्रेयसीने आत्महत्या केली असल्याची त्याची खात्री झाली. यानंतर संबंधित मुलीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जामखेड ग्रामीण रुग्णालय (Jamkhed Rural Hospital) आणण्यात आला.

त्याचवेळी या मुलीच्या प्रियकराने त्याच्या व्हॉट्सअपवर (WhatsApp) मी देखील माझे जीवन संपवत आहे, असे स्टेटस् ठेवले, आणि अवघ्या काही तासातच म्हणजे दुपारी तीन वाजेच्या दरम्यान मुलाने देखील शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केल्याची घटना घडली आहे. या बाबत दोघांनीही आत्महत्या का केली, याची माहिती अद्याप समोर आली नसून पोलीस त्या दृष्टीने तपास करीत आहेत. घटनेची माहिती समजताच घटनास्थळी पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनिल बडे यांच्यासह पोलीस कर्मचारी संभाजी शेंडे, शशी मस्के व संजय जायभाय यांनी भेट दिली.

दोन्ही आत्महत्येप्रकरणी जामखेड पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. प्रेमसंबंधातून या दोन्ही आत्महत्या झाल्याची माहिती पुढे येत आहे. याबाबतीत पोलिसांकडून अधिक चौकशी सुरू आहे.

- संभाजी गायकवाड (पोलीस निरीक्षक, जामखेड)

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com