खते, पेट्रोल, डिझेल, गॅस दरवाढ मागे घ्या
ADMIN

खते, पेट्रोल, डिझेल, गॅस दरवाढ मागे घ्या

राष्ट्रवादी काँग्रेसचे शेवगाव तहसीलदार पागिरे यांना निवेदन

शेवगाव (तालुका प्रतिनिधी) - केंद्र सरकारने खते, पेट्रोल, डिझेल, गॅसची केलेली दरवाढ त्वरित मागे घेण्यात यावी, या मागणीचे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पदाधिकार्‍यांनी सोमवारी (दि. 17) माजी आ. नरेंद्र घुले व चंद्रशेखर घुले तसेच शेवगाव पंचायत समितीचे सभापती डॉ. क्षितीज घुले यांक्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार अर्चना पागिरे यांना दिले.

दीड वर्षांपासून देशात करोनाने थैमान घातलेले आहे. या महामारीमुळे शेतकरी, कामगार त्रस्त झालेला आहेत. काहींसमोर दोन वेळक्या जेवणाची चिंता आहे. मान्सून 15 दिवसांवर येऊन ठेपल्याने शेतकरी मशागतीसह बियाणे व खते भरण्याक्या तयारीस लागलेला आहे. करोना काळात आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकर्‍यांना दिलासा देण्याऐवजी खतांचे भाव वाढून शेतकर्‍यांना धक्का देण्याचे काम केले आहे. वाढती महागाई, करोना उपचारावरील मोठा खर्च, हाताला काम नसल्यामुळे अर्थार्जन ठप्प यामुळे सर्वसामान्य शेतकरी व सर्वसामान्य अगोदरच आर्थिक संकटाक्या खाईत गटांगळ्या खात आहेत. भाववाढीमुळे कसे जगावे हा प्रश्‍न सतावू लागलेला आहे. मात्र खते, इंधन भाववाढीचा परिणाम मोठ्या क्षेत्रावर होणारा आहे. खतांक्या किंमतीत दीडपट भाववाढ केल्याचे निवेदनात म्हटले आहे. ही अन्यायकारक भाववाढ केंद्र सरकारने त्वरित कमी करावी, अन्यथा जनआंदोलन केले जाईल, याची सर्वस्वी जबाबदारी शासनावर राहील, असा इशारा देण्यात आला आहे.

निवेदन देण्यासाठी काकासाहेब नरवडे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा कार्याध्यक्ष संजय कोळगे, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष कैलास नेमाने, पंडितराव भागवत, कमलेश लांडगे, ताहेर पटेल, अशोक पातकळ, नंदुभाऊ मुंढे, समीर शेख, कृष्णा सातपुते, संतोष जाधव, संतोष पावसे उपस्थित होते.

2022 सालापर्यंत शेतकर्‍यांचे उत्पन्न दुप्पट करू, अशी घोषणा निवडणूक काळात करणार्‍या केंद्र सरकारने रासायनिक खतांक्या किंमतीत भरमसाठ वाढ केली आहे. यामुळे शेती कशी करायची हा प्रश्‍न शेतकर्‍यांसमोर उभा राहिला आहे. केंद्र सरकारने शेतकर्‍यांचा विश्‍वासघात केला आहे. ही भाववाढ कमी करावी, अन्यथा भाजपचे मंत्री, खासदार, आमदार यांना काळे झेंडे दाखवून निषेध करण्यात येणार असल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष दत्तात्रय फुंदे यांनी सांगितले.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com