लंघे यांच्या पुढाकारातून शिरसगावात 50 बेडचे कोविड केअर सेंटर

लंघे यांच्या पुढाकारातून शिरसगावात 50 बेडचे कोविड केअर सेंटर
संग्रहित

सलाबतपूर (वार्ताहर) - अहमदनगर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विठ्ठलराव लंघे पाटील यांच्या पुढाकाराने नेवासा तालुक्यातील शिरसगाव येथे स्वर्गीय आमदार वकिलराव लंघे पाटील फाउंडेशनच्यावतीने पन्नास बेड क्षमतेचे कोविड सेंटर सुरू करण्यात आले असून त्याचे उद्घाटन सोमवार दि.24 मे रोजी नेवासा येथील संत ज्ञानेश्‍वर महाराज मंदिर देवस्थानचे प्रमुख शिवाजी महाराज देशमुख यांच्याहस्ते करण्यात आले.

शिरसगाव येथील मातोश्री सुलोचनाबाई वकीलराव लंघे पाटील इंग्लिश मीडियम स्कूलच्या जागेत हे कोविड केअर सेंटर सुरू झाल्याने पंचक्रोशीतील नागरिकांना दिलासा मिळाला असून रुग्णसेवेच्या पुण्याच्या कार्याला सर्वांनी राष्ट्रीय कार्य समजून हातभार लावावा असे आवाहन यावेळी शिवाजी महाराज देशमुख यांनी केले.

यावेळी विठ्ठलराव लंघे पाटील म्हणाले की, राज्यात व जिल्ह्यात करोनाची परिस्थिती लक्षात घेता आपल्या पंचक्रोशीतील गावे सांभाळली तर करोनाचा प्रादुर्भाव कमी होऊ शकतो हे ध्यानात घेऊन आम्ही सर्वजण गावकरी मंडळी कार्यकर्ते यांच्या सहकार्याने हे कोविड सेंटर सुरू करत आहे. परिस्थिती पाहून बेडची संख्या वाढविली जाईल. या कोविड सेंटरमध्ये रुग्णांना मोफत उपचार व सुविधा दिली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

याप्रसंगी नवनाथ महाराज मुंगसे, जिल्हा परिषद सदस्या डॉ. तेजश्री लंघे, सरपंच छगनराव खंडागळे, माजी सरपंच नवनाथ देशमुख, पंचायत समितीचे सदस्य संजय खरे, प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. दीपक डिंबर, डॉ. संजय तावरे, डॉ. कदम, सुनील वाघमारे, वसंत बापू देशमुख, अरुण देशमुख, संतोष काळे, शहाजी गडेकर, दत्तात्रय पोटे, गणेश लंघे, प्रदिप ढोकणे यांच्यासह पंचक्रोशीतील मान्यवर उपस्थित होते.दत्तात्रय पोटे यांनी सूत्रसंचालन केले तर शिक्षक विठ्ठलराव काळे यांनी आभार मानले.

आजपासून सेंटर होणार कार्यान्वित

सदरचे कोविड सेंटर आज मंगळवारी कार्यान्वित करण्यात येणार असून रुग्णांना मोफत सेवा विठ्ठलराव लंघे व जिल्हा परिषदेच्या सदस्या डॉ. तेजश्री लंघे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली देण्यात येणार असल्याने अनेकांनी सेंटरच्या शुभारंभ प्रसंगी येथे देणगी जाहीर करत कोविड सेंटरला हातभार लावण्याचा प्रयत्न केला त्याबद्दल ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com