<p><strong>अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar</strong></p><p>वाढत्या करोना संसर्गामुळे जिल्ह्यात अत्यावश्यक सेवा वगळता जिल्ह्यातील सर्व आस्थापना बंद राहणार आहेत. </p>.<p>त्यामुळे जिल्ह्यातील वाईन शॉप, परमीट रूम 30 एप्रिलपर्यंत बंद राहणार असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्कचे निरीक्षक सराफ यांनी दिली. तसेच पार्सल सुविधा सुद्धा सुरू राहणार नसल्याने जिल्ह्यातील मद्यपीची पंचाईत होणार आहे. करोनाच्या पहिल्या लाटेत जिल्ह्यातील मद्य दुकाने बंद करण्यात आली होती. आता दुसर्या लाटेत जिल्ह्यातील अत्यावश्यक सेवा वगळता सर्वच बंद करण्यात आल्याने वाईन शॉप, परमीट रूम बंद राहणार असल्याचे मद्यप्रेमीसाठी ही वाईट बातमी आहे.</p>