आर्यन संबंधीच्या एनसीबीच्या चुकीच्या भूमिकेची चौकशी करणार

गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची माहिती
आर्यन संबंधीच्या एनसीबीच्या चुकीच्या भूमिकेची चौकशी करणार

पारनेर |प्रतिनिधी| Parner

आर्यन खान (Aryan Khan) याच्या विषय उच्च न्यायालयाने (High Court) नोंद मतावरून आर्यन निर्दोष (Innocent) असल्याचंही म्हटलक जाऊ शकते. असे असेल तर मग एनसीबीने (NCB) त्याच्या संबंधी चुकीची भूमिका घेतली का ? याचीही चौकशी केली जाईल, असे दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांनी म्हटले आहे. पारनेर तालुक्यातील (Parner Taluka) पिंपळनेर (Pimpalner) येथील कार्यक्रमासाठी वळसे पाटील आले होते. त्यावेळी प्रसारमाध्यमांनी त्यांना आर्यन खान (Aryan Khan) प्रकरणासंबंधी विचारलं असता त्यांनी ही माहिती दिली.

ड्रग्ज प्रकरणात (Case of Drugs) बॉलिवूड अभिनेता शाहरूख खान (Bollywood Actor Shah Rukh Khan) याचा मुलगा आर्यन खान (Aryan Khan) याच्या विरोधात सबळ पुरावे नसल्याचे मत उच्च न्यायालयाने (High Court) व्यक्त केलं आहे. त्यामुळे नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (Bureau of Narcotics Control) अर्थात एनसीबीला (NCB) मोठा धक्का बसला आहे. याबाबत राज्याचे गृहमंत्री वळसे पाटील (State Home Minister Walse Patil) यांनी एनसीबीने आर्य संबंधी चुकीची भूमिका घेतली का ? याचीही चौकशी केली जाईल, असे दिलीप वळसे पाटील (State Home Minister Dilip Walse Patil) यांनी म्हटलं आहे.

गृहमंत्री वळसे पाटील (State Home Minister Dilip Walse Patil) म्हणाले, मी आतापर्यंत यासंबंधीचा उच्च न्यायालयाचा निकाल (High Court Result) पूर्ण वाचलेला नाही. मात्र, जर त्यात मत व्यक्त करताना न्यायालयाने पुरावे नसल्याचं म्हटलं असेल तर आर्यन हा निर्दोष आहे, असंच म्हणावे लागेल. असे असूनही मग एनसीबीने (NCB) त्याच्या बाबतीत घेतलेली भूमिका चुकीची असेल तर त्यासंबंधीही चौकशी केली जाईल, असं सांगून केंद्र सरकारकडून तपास यंत्रणेचा सातत्याने चुकीचा वापर करत केला जात असल्याचा आरोपही वळसे पाटील यांनी केला. दरम्यान, याप्रकरणी राज्य सरकारकडून वेगळी चौकशी सुरू झाल्यास पुन्हा एकदा राज्य विरुद्ध केंद्र असा संघर्ष रंगण्याची शक्यता आहे. त्यामुळे याबाबत आगामी काळात काय घडामोडी घडतात, हे पाहणे महत्त्वाचं ठरणार आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com