सुपा |वार्ताहर| Supa

पारनेर तालुक्यातील वन विभागाच्यावतीने जागोजागी उभारलेले पाणवठे शोभेच्या वस्तू बनल्या असून त्यात पाणी नसल्याने वन्यप्राण्यांना पाण्यासाठी वनवन भटकावे लागत आहे.

मार्च, एप्रिल, मे या महिन्यांत पाण्याचा प्रश्न निर्माण होतो. या काळात माणसांना पाणी टंचाईच्या झळा जाणवतात. यामुळे पाळीव प्राणी संभाळने अवघड होवून बसते. त्यात वन्य प्राण्यांना कोणीवाली नाही. सुपा पंचकृषीत सुपा, शहाजापुर, जातेगाव, भोयरे गांगर्डा, पळवे,बाबुर्डी, कडूस, पाडळी रांजणगाव, जातेगाव, नारायणगव्हाण याठिकाणी वन विभागाने पाणवठे उभारले आहेत.

मात्र, प्रत्येक उन्हाळ्यात प्राण्यांना पाण्यासाठी वनवण भटकावे लागत आहे. वन्यप्राणी या महाभयंकर उन्हाळ्यात पाण्याच्या शोधासाठी मानवी वस्तीकडे धाव घेतात. परिसरातून नगर-पुणे महामार्ग जात असल्याने त्यात अनेक हरणांना जीव गमवावा लागला आहे. वन विभागाने जंगलातील पाणवठ्यांनी पाणी सोडावे अशी मागणी प्राणी प्रेमी व परीसरातील शेतकरी करत आहे.

गेल्या एक वर्षापासून करोनाने सर्व काही बंद असल्याने जेथे माणसाच्या अन्नाचा काही प्रमाणात सुटला असला तरी पाण्याचा प्रश्न मात्र दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. तीन महिन्यांवर पावसाळा आला आहे. दर महिन्यांत दोन-तीन वेळा पाणी सोडले तरी पाऊस पडल्यावर या प्राण्यांचा प्रश्न मार्गी लागेल.