श्रीगोंदा
श्रीगोंदा
सार्वमत

श्रीगोंदा : वन्यप्राण्यांच्या मांसाचे वाटेकरी कोण कोण ?

काळवीट, मोराच्या शिकारीने उघड केला वन्यजीव विभागाचा कारभार

Arvind Arkhade

श्रीगोंदा (तालुका प्रतिनिधी) - तालुक्यातील देऊळगाव येथील वनक्षेत्रात असणारे हरीण, काळवीट आणि मोराची शिकार करून या वन्यप्राण्याचे मास विक्री होत असल्याने देऊळगावमधील दोघांना वन्यजीव विभागाने ताब्यात घेतले असले तरी किती दिवसांपासून हा प्रकार सुरू होता, याबाबत तपासात दिशा स्पष्ट होणार का? यापेक्षा वनविभागाचे लक्ष वन्यजीवांकडे आहे का? हा प्रश्न उपस्थित झाला असून या गावातील अन्य कोण कोण या वन्यप्राण्यांच्या मांसाचे वाटेकरी होते, याचा तपास होणार का? याबाबत प्राणीमित्रांनी प्रश्न उपस्थित केला आहे.

तालुक्यात वनक्षेत्र मोठ्या प्रमाणात आहे. काही क्षेत्र वनविभागाच्या ताब्यात आहे तर काही क्षेत्र वन्यजीव विभागााकडे आहे. शहरात दोन्ही विभागांची कार्यलये आहेत. वनपरिक्षेत्र अधिकारी आणि त्यांच्या कर्मचार्‍यांची नेमणूक इथे आहे. मात्र तालुक्यातील वनखात्याबाबत तक्रार कायमच असतात. वनक्षेत्रात अवैध वाळूउपसा भीमा आणि घोड नदीच्या कडेच्या वनक्षेत्रात अवैध वाळू आणि माती उत्खनन याच बरोबर जंगल क्षेत्रात अवैध रस्ते करण्यात आले आहेत.

तर काही वनक्षेत्रात अतिक्रमण वाढली आहेत; मात्र याबाबत तक्रारी येऊनही कारवाईत दिरंगाई झाल्या आहेत. आता वनक्षेत्रात अतिक्रमण यापेक्षा गंभीर विषय म्हणजे वन्यप्राण्यांच्या मागे लागेलाला ससेमिरा यात वन्यप्राणी गावाजवळ येऊन त्याच्यामागे भटके कुत्रे लागणे यामुळे वन्यजीव अगोदरच भयभीत असताना वन्यजीवांच्या शिकारीचे प्रकरण समोर आल्याने वनविभागाच्या कामाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

देऊळगावमध्ये राष्ट्रीय पक्षी असणार्‍या मोराची हत्या आणि या बरोबर काळविटाची हत्या करून मांस विक्री केल्याची आणि हे मांस शिजवून खाल्ले असल्याच्या आरोपावरून दोन जणांना ताब्यात घेतले आहे. आता उपवनसंरक्षक अधिकारी यांच्याकडे याबाबत तपास असला तरी तपास कसा करतात याकडे गावकर्‍यांच लक्ष लागले आहे. काळवीट, मोराचे मांस तयार करून कुणाला विक्री केले का याचाही तपास करावा लागणार आहे.

Deshdoot
www.deshdoot.com