रानडुकरांची संख्या वाढली शेतकरी चिंताग्रस्त

file Photo
file Photo

सोनेवाडी |वार्ताहर| Sonewadi

कोपरगाव तालुक्यातील अनेक भागांमध्ये रानडुकरांची संख्या वाढल्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाला असून या रानडुकरांचा वनविभागाने बंदोबस्त करावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

सोनेवाडी, चांदेकसारे, घारी, नगदवाडी या परिसरात शेतकर्‍यांनी आपल्या शेतामध्ये सोयाबीन, मका, भाजीपाला आदी पिके घेतली आहे. मका हे पीकास प्रामुख्याने शेतकर्‍यांनी पसंती दिली. मात्र मका पिकालाच आता रानडुकरांपासून मोठा धोका वाढला. ही रानडुकरे टोळक्याने परिसरातील मका पिकावर रातोरात डल्ला मारत जमीनदोस्त करून चिकावर आलेल्या मकाच्या कणसांवर ताव मारतात.

एक-दोन एकर मकाचे पीक एकाच रात्रीत ही डुकरे उद्ध्वस्त करतात. शेतकर्‍यांनी ही डुकरे पळून लावण्यासाठी शेतात गस्त चालू केली आहे. मात्र बिबट्याचे सावट असल्याने तोही धोका शेतकर्‍यांनी पत्करला आहे. या डुकरांचा कोणत्याही परिस्थितीत वन विभागाने बंदोबस्त करावा, अशी मागणी परिसरातून होत आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com