
नेवासा |तालुका प्रतिनिधी| Newasa
नेवासा (Newasa) तालुक्यातील खेडले काजळी (Khedale Kajali) येथे शेतात खुरपणी करणार्या महिलेवर (Woman) रानडुकराने (Wild Boar) केलेल्या हल्ल्यात (Attack) महिला गंभीर जखमी (Injured) झाल्याची घटना घडली.
याबाबत माहिती अशी की, नेवासा (Newasa) तालुक्यातील गोदाकाठ परिसरात रानडुकरांचे (Wild Boar) अनेक कळप आहेत. या रानडुकरांनी धुमाकूळ घातला आहे. खेडले काजळी येथील मीराबाई परसराम कोरडे या दि. 18 रोजी नवीन लागवड केलेल्या उसात खुरपणी करीत होत्या. दुपारी अचानक आलेल्या रानडुकरांच्या कळपातील डुकराने (Wild Boar) त्यांच्यावर हल्ला करून मांडीला चावा घेतला. त्यात त्या गंभीर जखमी (Injured) झाल्या आहेत.
रानडुकरांमुळे पिकांचे (Crops) अतोनात नुकसान होत असून शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. विशेषतः गहू, हरभरा (Gram), कांदे (Onion) व भाजीपाला या पिकाचे या परिसरात मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. मका पिकाचे (Corn Crops) शेत तर रानडुकरांकडून पूर्णपणे नामशेष करण्यात येते. पिक विमा कंपन्याही रानडुकराने केलेल्या पिकांची नुकसान (Crops Loss) भरपाई देत नाहीत.
वन खात्याने (Forest Department) गंभीर दखल घेऊन रानडुकरांचा बंदोबस्त करावा अशी मागणी माजी सरपंच निर्मलाताई ढगे यांनी केली आहे.