पत्नीचा खून करून आत्महत्या दाखविण्याचा प्रयत्न

पती विजय गवळी विरुध्द खुनाचा गुन्हा दाखल
पत्नीचा खून करून आत्महत्या दाखविण्याचा प्रयत्न

कोपरगाव (तालुका प्रतिनिधी) - कोपरगाव तालुक्यातील मढी खुर्द येथे पती पत्नीच्या झालेल्या भांडणात पतीने पत्नीच्या डोक्यावर शस्त्राने मारून ठार केले. त्यानंतर मृत शरीरावर ज्वालाग्राही पदार्थ टाकून जाळण्याचा प्रयत्न केला. पुरावा नष्ट करण्यासाठी मृत शरीरावर नवीन कपडे घालून पत्नीने आत्महत्या केल्याची खोटी माहिती नातेवाईकांना देऊन पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. आरोपी विजय आप्पासाहेब गवळी रा. मढी खुर्द याच्या विरुद्ध कोपरगाव तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कोपरगाव तालुक्यातील मढी खुर्द येथील सुवर्णा विजय गवळी हिने आत्महत्या केली असल्याच्या खबरीवरून कोपरगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. पोलिस निरीक्षक दौलत जाधव यांनी घटनेची सखोल चौकशी केली असता त्यातून ही आत्महत्या नसून घातपात असल्याचे समोर आले.

याबाबत पो.कॉ. अमर गवसने यांनी फिर्याद दिली. त्यात म्हंटले आहे, तालुक्यातील मढी खुर्द येथील सुवर्णा गवळी हिचे व तिचा पती आरोपी विजय गवळी यांच्यात दि. 13 मे रोजी रात्री 8 वाजेच्या सुमारास झालेल्या भांडणात आरोपीने मयताच्या डोक्यावर मागील बाजूस काहीतरी टणक शस्त्राने मारून जिवे ठार मारले. त्यानंतर मृत शरीरावर ज्वालाग्रही पदार्थ टाकून जाळण्याचा प्रयत्न केला. पुरावा नष्ट करण्यासाठी तिच्या अंगावरील जळालेले कपड्यांचे अवशेष लपवून ठेवले. तिच्या मृत शरीरावर नवीन कपडे घातले व मयताने आत्महत्या केल्याची खोटी माहिती नातेवाईकांना देऊन पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला.

आरोपी पती विजय गवळी यांच्या विरुद्ध तालुका पोलीस ठाण्यात भादवि कलम 302,201 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे .

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com