पत्नीस आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पतीविरुद्ध गुन्हा दाखल

पत्नीस आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पतीविरुद्ध गुन्हा दाखल

अकोले |प्रतिनिधी| Akole

आई वडिलांकडून दोन लाख रूपये घेऊन ये तरच तुला नांदविल, पैसे दिले नाही तर घरातून हाकलून देईन व दुसरीशी लग्ण करेल अशी धमकी देवून वेळोवेळी मानसिक व शारीरिक छळ करुन पत्नीस आत्महत्येस प्रवृत्त केले प्रकरणी पती बाळासाहेब विष्णू वाकचौरे ( रुंभोडी) विरूद्ध अकोले पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अकोले पोलिसांकडुन मिळालेल्या माहितीनुसार तालुक्यातील रुंभोडी येथील शितल बाळासाहेब वाकचौरे या 35 वर्षिय विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केले प्रकरणी अकस्मात मृत्यू सी आर.पी.सी 174 प्रमाणे दाखल होते त्यानंतर निर्मला हरिश्चंद्र रोकडे (रा.अण्णाभाऊ साठे नगर,वाबळे इस्टेट, ठाणे) यांनी अकोले पोलिसांत फिर्याद दिली असून त्यात म्हटले आहे की, दि 01/05/2010 ते 03/06/2022 पर्यत फिर्यादीची मुलगी शितल बाळासाहेब वाकचौरे तिच्या सासरी राहते घरी नांदत असताना पती बाळासाहेब विष्णू वाकचौरे याने तू तुझ्या आई वडिलांकडून दोन लाख रुपये घेऊन ये तरच मी तुला नांदविल तू पैसे नाही आणले तर तुला घरातून हाकलून देईल असे म्हणून वेळोवेळी तिला मारहाण व शिवीगाळ करत तसेच तु पैसे नाही आणले तर मी दुस-या महिले बरोबर लग्न करेन अशी धमकी देवून तिचा मानसिक व शारीरिक छळ करून तिला आत्महत्त्या करण्यास केले असल्याचे फिर्यादीवरून अकोले पोलिस स्टेशनला भादंवी कलम 306, 498 (अ) 504, 506,प्रमाणे दाखल केले असून पुढील तपास सहा.पो.नी. मिथुन घुगे हे करत आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com