पत्नीचा विनयभंग, जाब विचारणार्‍या पतीला मारहाण

कोठला येथील घटना || दोघांविरूध्द गुन्हा
पत्नीचा विनयभंग, जाब विचारणार्‍या पतीला मारहाण

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

पाणीपुरी खात असलेल्या विवाहितेचा हात पकडून लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करून पतीला मारहाण केल्याची घटना कोठला परिसरात घडली. याप्रकरणी उपनगरात राहणार्‍या पीडित विवाहितेने तोफखाना पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून चंद नवाब शेख (रा. कोठला) व एक अनोळखी विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नगर शहरातील एका उपनगरात राहणार्‍या फिर्यादी व त्यांचे पती 9 ऑगस्ट रोजी रात्री मोहरम उत्सव बघून कोठला येथे पाणीपुरी खाण्यासाठी थांबले होते. तेथे चंद व एक अनोळखी इसम आला. चंद याने फिर्यादीचा हात पकडून लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले. फिर्यादी यांच्या पतीने चंदला जाब विचारला असता चंद व त्याच्या सोबतच्या अनोळखीने फिर्यादीच्या पतीला शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.

फिर्यादीच्या पतीचा खिसा फाटून खिशातील खाली पडलेले 17 हजार रुपये चंद शेख घेऊन पळून गेला व खिशातील मोबाईल खाली पडून गहाळ झाला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. अधिक तपास तोफखाना पोलीस करीत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com