जमीन वहिवाटीवरून पत्नीने मुली व जावयाच्या मदतीने केला नवऱ्याचा खून

जमीन वहिवाटीवरून पत्नीने मुली व जावयाच्या मदतीने केला नवऱ्याचा खून
Crime

पाथर्डी |तालुका प्रतिनिधी| Pathardi

नावावरील जमीन वहिवाटीला हरकत घेतो म्हणून पत्नीने मुली व जावयाच्या मदतीने नवऱ्याला जीवे ठार मारल्याची (wife killed her husband with the help of her daughters and son-in-law) घटना तालुक्यातील तिसगाव (tisgav) येथे घडली आहे. रविवार (४ जुलै) रोजी दुपारी साडेतीन वाजण्याच्या दरम्यान ही घटना घडली. याबाबत मयताचा आतेभाऊ लक्ष्मण भीमराज अडसरे यांनी पाथर्डी पोलीस ठाण्यात मयताची पत्नी, दोन मुली व जावया विरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला (Filed a murder charge) आहे.

याबाबत पोलिसांकडून (Police) मिळालेली माहिती अशी की, मयत राधाकीसन नंदराम नरवडे यांच्या नावावरील जमीन त्यांच्या पत्नीने दहा वर्षापूर्वी फसवून स्वतःच्या नावावर खरेदी करून घेतली. ही गोष्ट नरवडे यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी जमीन वहिवाटीस हरकत घेतली. जमीन वहिवाटीस हरकत घेतल्याचा राग मनात धरून रविवारी पत्नी, जावई व दोन मुलींनी त्यांना लाकडी दांडके व दगडाने जबर मारहाण (Beating) केली त्यात राधाकिसन नरोडे यांचा मृत्यू (Death) झाला.

लक्ष्मण अडसरे यांच्या फिर्यादीवरून पत्नी गयाबाई राधाकिसन नरवडे, जावई संदीप महादेव ढाळे, मुलगी मीरा संदीप ढाळे व अनिता अशोक झिरपे यांच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक के.एस.वाघ (Assistant Inspector of Police KS Wagh) पुढील तपास करत आहेत.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com