अधिकारी पतीच्या कामात पत्नीचा अडथळा

नगरमधील 'कोणत्या' कार्यालयात घडली घटना? गुन्हा दाखल
अधिकारी पतीच्या कामात पत्नीचा अडथळा

अहमदनगर|Ahmedagar

पती कार्यालयात (Husband in office) काम करत असताना पत्नीने (Wife) तेथे येऊन पतीला शिवीगाळ करत फाईली फेकून दिल्याची घटना येथील महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयात (Maharashtra Life Authority office) घडली. याप्रकरणी पती विजयकुमार दिलीप वाईकर (वय 30 रा. गुलमोहर रोड, सावेडी) यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात (Topkhana Police Station) दिलेल्या फिर्यादीवरून त्यांची पत्नी मयुरी विजयकुमार वाईकर व उज्ज्वला प्रकाश कुंभार (रा. नागठाणे जि. सातारा) यांच्याविरोधात सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

विजयकुमार वाईकर तारकपूर (Tarakpur) येथील महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयात (Maharashtra Life Authority office) अधिकारी म्हणून काम करतात. सोमवारी ते कार्यालयात काम करत असताना त्यांची पत्नी मयुरी तेथे आली. ती विजयकुमार यांना म्हणाली, तु तुझ्या पगाराच्या स्लीपा मला दे, असे म्हणून आरडाओरडा करून विजयकुमार यांना शिवीगाळ केले. जर पगाराच्या स्लीपा दिल्या नाही तर मी माझ्या जीवाचे बरेवाईट करेल, अशी धमकी देऊन विजयकुमार यांच्याकडील फाईली हिसकावून घेत फेकून दिल्या. यानंतर मयुरीने उज्ज्वला कुंभारे हिला फोन केला व तो फोन विजयकुमार यांच्याकडे दिला. तेव्हा उज्ज्वलाने विजयकुमार यांना शिवीगाळ केले. विजयकुमार मिटींगसाठी जात असताना मयुरीने त्यांना जाण्यास अटकाव करत सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक समाधान सोळुंके (Sub-Inspector of Police Samadhan Solunke) करीत आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com