पत्नीस पोटगी न देणार्‍याला अटक

संगमनेर न्यायालयाने काढले होते वाँरट
पत्नीस पोटगी न देणार्‍याला अटक

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

दोन वर्षांपासून पोटगीच्या वॉरंटमधील फरार असलेला व मिसींग दाखल असलेल्या आरोपीला अटक करण्यात आली आहे. भिंगार कॅम्प पोलिसांनी ही कारवाई केली. शेख मजहर आयाज (वय 41 रा. बडी मरीयम मस्जिदजवळ, मुकुंदनगर, अहमदनगर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

28 डिसेंबर 2019 रोजी आरोपी शेख मजहर आयाज राहत्या घरातून निघून गेला असल्याची माहिती आयाज अहमद शेख (रा. मुकुंदनगर) यांनी कॅम्प पोलिसांना दिली होती. या संदर्भात पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. तपासादरम्यान आरोपी शेख याचे पोटगी वॉरंट काढले असून तो पोटगीमधील रक्कम चुकवत असून न्यायालयात तारखेला हजर रहात नव्हता. 19 मार्च रोजी संगमनेरच्या प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांनी शेख विरोधात स्टँडिंग वॉरंट काढून ते बजावणीसाठी आदेश भिंगार कॅम्प पोलिसांना दिले होते.

सहाय्यक निरीक्षक शिशिरकुमार देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक एम. के. बेंडकोळी, अंमलदार जी. वाय. जठार, आर. एन. कुलांगे, व्ही. सी. गंगावणे, एस. जी. शेख, आर. के. दरेकर, के. जे. चव्हाण, एस. बी. सोनवणे यांच्या पथकाने आरोपीला अटक केली. आरोपी शेखला संगमनेर येथील न्यायालयासमोर समक्ष हजर केले असता त्याला न्यायालायाने 20 दिवस कारावासाची शिक्षा सुनावली आहे.

Related Stories

No stories found.