सलाबतपुर येथे मावा गुटख्याची सर्रास विक्री
सार्वमत

सलाबतपुर येथे मावा गुटख्याची सर्रास विक्री

याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

Nilesh Jadhav

सलाबतपुर | वार्ताहर | Salabtpur

"गाव कोमात, मावा विक्री जोमात" अशी परिस्थिती सध्या नेवासा तालुक्यातील सलाबतपुर गावात दिसून येत आहे. सलाबतपुर गावात करोनाचा प्रादुर्भाव वाढत असून गेल्या तीन दिवसात करोना बाधितांची संख्या २४ इतकी झाली आहे.

सलाबतपुर येथील बाजारपेठा बंद असून देखील गाव व परिसरात मावा गुटख्याची सर्रास विक्री सुरू आहे. परिसरातील अनेक तरुण व्यसनाच्या आहारी गेले आहे. यातुन संसर्ग वाढण्याचा धोका वाढला आहे. स्थानिक प्रशासक तसेच पोलिस प्रशासन याकडे जाणुनबुजून दुर्लक्ष करीत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये चालू आहे.

Deshdoot Digital Dhamaka | देशदूत डिजिटल धमाका
www.deshdoot.com