नगर जिल्हा रूग्णालयातील आगीच्या घटनेस जबाबदार कोण?

नगर जिल्हा रूग्णालयातील आगीच्या घटनेस जबाबदार कोण?

अहमदनगर - जिल्हा रूग्णालयातील अतिदक्षता विभागाला लागलेल्या आगीच्या घटनेने धक्का दिला आहे. या घटनेत 10 जणांचा मृत्यू झाला असून मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान, या दुर्घटनेस जबाबदार कोण, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. मात्र व्यवस्थेचे अक्षम्य दुर्लक्षच या घटनेस जबाबदार असल्याचा आरोप होत आहे.

नगर जिल्हा रूग्णालयातील आगीच्या घटनेस जबाबदार कोण?
VIDEO : जिल्हा रुग्णालयाच्या करोना ICU विभागाला भीषण आग

जिल्हा रूग्णालयाच्या अतिदक्षता विभागाला शनिवारी सकाळी 10 च्या सुमारास आग लागली. शॉर्टसर्कीटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. करोना काळात शासनाने जिल्हा रूग्णालयातील व्यवस्थेवर मोठा खर्च केला. राज्यात याआधीही रूग्णालयांमध्ये आगीच्या घटनांमध्ये अनेकांना जीव गमवावा लागला. त्यामुळे अधिक काळजी घेण्याच्या सूचना होत्या.

नगर जिल्हा रूग्णालयातील आगीच्या घटनेस जबाबदार कोण?
नगर जिल्हा रुग्णालयाला आग; १० जणांचा होरपळून मृत्यू, ७ वर उपचार सुरु

त्यानंतरही नगर जिल्हा रूग्णालयात लागलेल्या आगीच्या घटनेने अनेक प्रश्न उपस्थित केले आहे. स्थानिक आमदार संग्राम जगताप यांनी रूग्णालय प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करून चौकशीची मागणी केली आहे. या घटनेमुळे रूग्णांचे नातेवाईक संतप्त असून जिल्हा रूग्णालयाच्या अधिकारी व कर्मचार्‍यांवर तातडीने कारवाईची मागणी केली जात आहे.

दरम्यान, राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे व खासदार डॉ.सुजय विखे पाटील नुकतेच जिल्हा रूग्णालयात पोहचले होते

नगर जिल्हा रूग्णालयातील आगीच्या घटनेस जबाबदार कोण?
नगर जिल्हा रुग्णालयात अग्नितांडव; 'या' दहा जणांचा मृत्यू
नगर जिल्हा रूग्णालयातील आगीच्या घटनेस जबाबदार कोण?
अग्नीकांड : दोषींना सोडणार नाही, पालकमंत्री तातडीने नगरकडे रवाना

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com