अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

तालुक्यातील जेऊरपाठोपाठ अरणगाव येथील जुगार अड्ड्यावर नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. प्रतापराव दिघावकर यांच्या विशेष पथकांने छापा टाकला.

व्यापारी, शेतकरी, ठेकेदार, नोकरदार असलेल्या 25 जुगार्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्याविरूद्ध नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या सर्व जुगार्यांकडून पोलिसांनी 4 लाख 55 हजार 160 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. त्यात 84 हजार 610 रुपयांची रोकड, 3 लाख 70 हजार रुपयांची वाहने, व 550 रुपयांच्या जुगार साहित्याचा समावेश आहे.

पकडण्यात आलेल्या जुगार्यांमध्ये योगेश माणिक सुपेकर (रा. शिवाजीनगर, केडगाव), सागर शिवाजी कोल्हे, अनिल हरिभाऊ दरेकर (दोघे रा. एमआयडीसी, नगर), जगन्नाथ केरू शिदे, गोविंद शिवराम शिदे, दशरथ देवराम कांबळे, भाऊसाहेब विठ्ठल गायकवाड, विशाल तुळशिराम थोरात (सर्व अरणगाव ता. नगर), अल्लाऊद्दीन ईसाक सैय्यद (रा. पाथडी), महेंद्र शिवानंद भांबळ, विशाल बबनराव चांदणे (दोघे रा. सिध्दार्थनगर, नगर), विजय बबनराव शिंदे (रा. टिळक रोड, नगर), दत्तात्रय खुशालचंद गिरमे (रा. केडगाव), हकिल अजीज पठाण (रा. श्रीरामपूर), भाऊसाहेब दिलीप तोरडमल (रा. श्रीगोंदा), सुनील बंडू शितोळे, राहुल सुदाम गिरे (रा. शिरूर जि. पुणे), अनिल रामदास बोठे (रा. देऊळगाव सिध्दी ता. नगर), गणेश प्रल्हाद चौभे, भरत अर्जुन चोभे (दोघे रा. बाबुर्डी बेंद ता. नगर), विकास पदमाकर वराडे (रा. भिंगार), शेख लतीफ फत्तुभाई (रा. तिसगाव ता. शेवगाव), कैलास मच्छिंद्र लष्करे (रा. नेवासा), किरण बबन मुके (रा. कल्याण रोड, नगर), संतोष दादाभाऊ साबळे (रा. पारनेर) यांचा समावेश आहे. ही कारवाई विशेष पथकातील सहायक पोलीस निरीक्षक सचिन जाधव, उपनिरीक्षक संदीप पाटील, राजेंद्र सोनवणे, प्रमोद मंडलिक, नितीन सकपाळ, उमाकांत खापरे, विश्वास हजारे, सचिन वाघ, बापू बागले, कुणाल मराठे, केतन पाटील, नारायण लोहरे यांनी केली आहे.

तालुका पोलिसांचा कारभार संशयाच्या भोवर्यात

जेऊरपाठोपाठ नगर तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या अरणगाव-खंडाळा शिवारात विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्या पथकाने छापा टाकला. तालुक्यातील सर्वात मोठा जुगार अड्डा म्हणून गेल्या काही दिवसांपासून नावारूपास आला होता. येथे नगर शहरासह आजूबाजूचे जुगारी जुगार खेळण्यासाठी येत असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे एमआयडीसी पाठोपाठ नगर तालुक्यात सुरू असलेला जुगार अड्डा कोणाच्या आशिर्वादाने सुरू होता? या जुगार अड्ड्याकडे तालुका कोणाच्या आदेशाने दुर्लक्ष करत आहे? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.