चासनळी (वार्ताहर) -

गहू सोंगणीसाठी लागणारे हार्वेस्टर हरियाणा आणि पंजाब या परप्रांतातून येत असतात. मात्र स्थानिक युवकांनी त्यांची मक्तेदारी मोडून काढत हार्वेस्टरने

व्यवसायाला सुरुवात करून ग्रामीण भागात रोजगार निर्मिती केली आहे.

मनमानी भाव व हंगाम संपत आल्यानंतर गहू तसाच टाकून आपल्या प्रांतात गहू काढण्यासाठी निघून जात असल्यामुळे लेट पेरणी केलेले गहू काढण्यासाठी शेतकर्यांना जादा पैसे मोजावे लागत होते मात्र चासनळी परिसरात युवकांनी एकत्र येत हार्वेस्टरचा नवीन व्यवसाय सुरू केल्यामुळे स्थानिक शेतकरी त्यांना पसंती देत आहे. कांद्याची रोपे नसल्यामुळे यावर्षी गव्हाचे क्षेत्र जास्त प्रमाणात वाढले असून स्थानिक युवकांनी शेतीला जोडधंदा म्हणून गहू सोंगणीचा व्यवसाय सुरू केला आहे. सध्या गहू सोंगणीला वेग आला असून डिझेलचे दर वाढूनही मागील वर्षी इतकाच भाव असल्यामुळे शेतकरी आनंदित झाला आहे.

यावर्षी चांगला पाऊस पडल्यामुळे गव्हाची पेरणी झाली परंतु ढगाळ हवामान, अपुरी थंडी यामुळे गव्हावर मावा रोगाचा प्रादुर्भाव झाल्यामुळे सरासरी एकरी 10 ते 12 क्विंटल निघत आहे. एरवी ते उत्पादन 15 ते 20 क्विंटल असते. त्यामुळे गव्हाचे अर्थकारण थोडे कोलमडले आहे, असे प्रगतशील युवक शेतकरी पप्पू गाडे यांनी सांगितले.