व्हॉट्सअ‍ॅपवर अश्लिल मेसेज पाठवून महिलेला छेडले

नेवाशाच्या तरुणाविरूध्द कोतवाली पोलिसांत गुन्हा
व्हॉट्सअ‍ॅपवर अश्लिल मेसेज पाठवून महिलेला छेडले

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

मागील पाच महिन्यांपासून महिलेकडील मोबाईलवरील व्हॉट्सअ‍ॅपवर अश्लिल मेसेज व रेकॉर्डिंग पाठवून लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन करणार्‍या तरुणाविरूध्द येथील कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित महिलेने फिर्याद दिली आहे.

जयश विजय जाधव (रा. निंभारी ता. नेवासा) असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे. 20 एप्रिल, 2022 ते 13 सप्टेंबर, 2022 दरम्यान ही घटना घडली असून 13 सप्टेंबर रोजी गुन्हा दाखल झाला आहे. नगर शहरात राहणार्‍या एका विवाहितेच्या मोबाईल नंबरवरील व्हॉट्सअ‍ॅपवर जाधव याने त्याच्या मोबाईल नंबरवरील व्हॉट्सअ‍ॅपवरून अश्लिल मेसेज व रेकॉर्डिंग पाठवून महिलेसोबत लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन केले. तसेच त्यांचे पती व मेव्हणे यांना फोन करून शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली असल्याचे पीडितेने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. अधिक तपास कोतवाली पोलीस करीत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com