राहुरी, श्रीरामपूरच्या आकाशातून रात्रीच्या अंधारात नेमकं काय गेलं?.... नागरिकांनी अनुभवले अनोखे दृष्य

राहुरी, श्रीरामपूरच्या आकाशातून रात्रीच्या अंधारात नेमकं काय गेलं?.... नागरिकांनी अनुभवले अनोखे दृष्य

श्रीरामपूर (प्रतिनिधी)

नगर जिल्ह्यातील राहुरी, श्रीरामपूरसह काही भागांमध्ये तसेच मराठवाड्याच्या अनेक जिल्ह्यांच्या आकाशात वेगळंच चित्र पाहायला मिळालं. आकाशातून पाच गोळे एकाच रांगेतून जाताना नागरिकांनी बघितले.

आकाशातून जाणार्‍या या वस्तू नेमक्या काय आहेत? याबाबत नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं होतं. आकाशातून उडत जाणार्‍या या वस्तू पाहण्यासाठी नागरिकांची एकच गर्दी झाली होती. परग्रहावरून एलियन तर आले नाहीत ना? याची चर्चाही नागरिक करत होते.

राहुरी, श्रीरामपूरच्या आकाशातून रात्रीच्या अंधारात नेमकं काय गेलं?.... नागरिकांनी अनुभवले अनोखे दृष्य
एका लग्नाची जगावेगळी गोष्ट! नवरी पळाली भुर्रर्र...नवरा पाहतच राहिला

श्रीरामपुरात काही काळ काही लोकांना मात्र राहुरीच्या काही भागात पहावयास मिळाले. अनेकांंना मराठवाड्याच्या हिंगोली, विदर्भातल्या बुलढाणा, चंद्रपूर आणि गडचिरोलीच्या आकाशात चमकणार्‍या या वस्तू दिसल्या. दरम्यान एलन मस्क यांच्या 55 सॅटलाईनच्या स्कायलिंकची ही ट्रेन असावी, अशी चर्चा सुरू आहे. खगोलशास्त्रज्ञांमध्ये याबाबत कुतूहल आहे.

संध्याकाळी 7 वाजून 20 मिनिटांनी नागरिकांनी दक्षिणेकडून उत्तरेकडे जाणारी एक वस्तू बघितली. यानंतर लोकांमध्ये भीतीचं वातावरण तयार झालं. लोकांना धुमकेतू, उल्का किंवा आकाशातून पडलेल्या सॅटलाईटचे तुकडे असावेत, असं वाटलं.

राहुरी, श्रीरामपूरच्या आकाशातून रात्रीच्या अंधारात नेमकं काय गेलं?.... नागरिकांनी अनुभवले अनोखे दृष्य
थकीत पैशांची मागणी केल्याने कंपनी मालकावर हल्ला

आकाशातून गेलेल्या त्या वस्तूला स्पेस-एक्स असं म्हणतात. हे स्टारलिंक सॅटलाईट्स आहेत. जगातून अनेक ठिकाणी हे दिसतात. 2019 मध्ये याची सुरूवात झाली. इंटरनेट प्रोव्हायडर म्हणून हे सॅटलाईट्स कामाला येतात. 55 सॅटलाईट्सची ती मालिका होती. एकामागोमाग एक हे सॅटलाईट्स जातात, असं खगोलशास्त्रज्ञांनी सांगितलं आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com