ओला दुष्काळ प्रश्न विधानसभेत मांडावा

विरोधीपक्षनेते पवार यांना डॉ. घुले यांचे पत्र
ओला दुष्काळ प्रश्न विधानसभेत मांडावा

शेवगाव |तालुका प्रतिनिधी| Shevgav

शेवगाव, पाथर्डी व नेवासा तालुक्यात यावर्षी सरासरी पेक्षा जास्त पाऊस झाल्याने खरीप पिकांसह फळबागांचे मोठयाप्रमाणावर नुकसान झाले आहे. या आठवडयात अतिवृष्टी झाली असून शासनाने तात्काळ ओला दुष्काळ जाहीर करुन सरसकट सर्व पिकांच्या नुकसान भरपाईचा पाठपुरावा विधानसभेत मांडण्यासाठी माजी आमदार व ज्ञानेश्वर कारखान्याचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र घुले यांनी विरोधी पक्ष नेते अजित पवार यांच्याकडे निवेदन सादर केले.

विरोधी पक्ष नेते पवार हे जिल्हा दौर्‍यावर असतांना डॉ. घुले यांनी पवार यांची शेतकर्‍यांच्या शिष्टमंडळासह भेट घेतली. यावेळी घुले यांनी शेवगाव, पाथर्डी व नेवासा तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीची माहिती दिली. त्यांनी या तिन्ही तालुक्यातील खरीप हंगामातील कापूस, तुर, मुग, सोयाबीन, कांदा, उडीद या पिकांच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीची वस्तुनिष्ठ माहिती दिली. पवार यांना दिलेल्या मागण्यांच्या निवेदनात म्हटले आहे की, यावर्षी जुन पासून मोठया प्रमाणात पाऊस होत असून तिन्ही तालुक्यातील पावसाने सरासरी ओलांडली आहे.

त्यामुळे सरकारने केवळ पंचनाम्याचा फार्स न करता सर्वच पिकांचे सरसकट नुकसान झाले आहे. हे गृहीत धरुन व ओला दुष्काळ जाहीर करुन शेतक-यांना तातडीने मदत जाहीर करावी. खरीप पिकावर झालेला खर्च देखील अतिवृष्टीच्या फटक्यामुळे निघणार नसल्याने शेतक-यांवर ऐन दिवाळीच्या पार्श्वभुमीवर संकट कोसळले आहे. नामदार पवार यांनी विधानसभेत सरकारकडे या तिन्ही तालुक्यातील शेतकर्‍यांच्या वतीने ही मागणी लावून धरु असा प्रतिसाद देत या तालुक्यातील शेतकर्‍याना वार्‍यावर सोडणार नाही असे आश्वासन शिष्टमंडळाला दिले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com