
वैजापूर |प्रतिनिधी| Vaijapur
वैजापूर (Vaijapur) शहर व परिसरात मागील काही दिवसात अपघाती (Accident) मृत्यूचे प्रमाण वाढले असून कालच दोघांचा अपघाती मृत्यू (Accident Death) झाल्याची घटना ताजी असतानाच आज पुन्हा विहिरीचे काम (Well Work) सुरू असताना क्रेनचा वायररोप तुटुन क्रेन चालकाचा क्रेनसह विहिरीत पडून मृत्यू (Death By Falling Into a Well) झाल्याची दुर्दैवी घटना घडली. या अपघातात विहिरीत असलले चार कामगार सुदैवाने बचावले.
जनार्दन उर्फ रवींद्र सुधाकर पवार (वय 32, रा. बोरसर, ता. वैजापूर) असे या घटनेतील मयत तरुणाचे नाव आहे. याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या अधिक माहितीनुसार, रवींद्र पवार यांची भिवगाव शिवरात गट क्रमांक 62 मध्ये शेती आहे, त्याच्या शेतात विहिरीचे (Well) काम स्वतःच्या क्रेनने सुरू होते, व तेच क्रेन चालवत होते. रविवारी दुपारच्या सुमारास काम सुरू असताना अचानक क्रेनचे वायररोप तुटले व पवार क्रेनसहित विहिरीत (Well) पडले.
क्रेन 25 फूट विहरीत पडत अडकली. मात्र रवींद्र हे विहिरीत तळात 65 फूट खाली पडले. त्यांच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू (Death) झाला. हा अपघात झाला तेव्हा चौघे मजूर हे विहारात काम करत होते. क्रेन विहिरीत (Well) अडकल्याने चौघांचा जीव सुदैवाने बचावला. त्यांना नागरिकांनी दोरीच्या साहाय्याने बाहेर काढले व पोलिसांना घटनेची माहिती दिली.
घटनेची माहिती मिळताच वैजापूर पोलीस ठाण्याचे (Vaijapur Police Station) सहाय्यक पोलीस निरीक्षक घाडके, पोलीस उपनिरीक्षक रज्जाक शेख, योगेश झाल्टे, पोलीस कॉन्स्टेबल पडवळ यांनी घटनास्थळी धाव घेतली व नागरिकांच्या मदतीने हायड्रा क्रेनच्या सहाय्याने क्रेन बाहेर काढून रवींद्र यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केला. रविद्र पवार यांच्यावर सायंकाळी बोरसर (Borsar) येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. याप्रकरणी रवींद्र पवार यांचे चुलत भाऊ भावराव पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार वैजापूर पोलिसात नोंद करण्यात आली आहे.