विहिरीत आढळला मृत बिबट्या

विहिरीत आढळला मृत बिबट्या

नेवासा |तालुका प्रतिनिधी| Newasa

तालुक्यातील तेलकुडगाव येथील शेतकरी छानदेव घोडेचार यांच्या जेऊर रस्त्यावरील शेतात असलेल्या विहिरीत आठ ते नऊ वर्षे वयाचा नर जातीचा बिबट्या मृत अवस्थेत आढळून आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, मंगळवार दिनांक 4 एप्रिल रोजी दुपारी तेलकुडगाव येथील शेतकरी छानदेव घोडेचोर यांच्या विहिरीमध्ये बिबट्या पडल्याचे आढळून आले. त्यांनी वनविभागाला कळविल्याने वनपाल देविदास पातारे, वनरक्षक मुस्ताक शेख, वन कर्मचारी संदीप ठोंबरे, ज्ञानदेव गाडे, सयाजी मोरे, प्रवीण पटारे, सखाराम पटारे यांनी घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली असता विहिरीत पडलेला आठ ते नऊ वर्षाचा बिबट्या मृत अवस्थेत आढळून आला.

वन कर्मचार्‍यांनी मृत बिबट्याला बाहेर काढून घटनास्थळीच त्याचे शवविच्छेदन केले व पुढील विल्हेवाट लावण्यासाठी लोहगाव नर्सरीकडे रवाना केले. सदर बिबट्या दोन दिवसांपूर्वी विहिरीत पडला असावा असा अंदाज आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com