
अस्तगाव |वार्ताहर| Astgav
भक्ष्य पकडतांना बिबट्याची (Leopard) उडी विहिरीत (Well) गेली अन तो प्राणास मुकला. अस्तगाव (Astgav) शिवारात एक बिबट्या विहीरीत पाण्यात बुडून मृत (Death) पावला आहे.
अस्तगाव (Astgav) शिवारातील व रांजणगाव खुर्द (Rajangav Khurd) शिवेवरील विलास शंकर जेजुरकर, संजय शंकर जेजुरकर व सुभाष अन्याबापु जेजुरकर यांच्या गटनंबर 1225 मधील शेतातील विहीरीवर गुरुवारी सकाळी 10 वाजता सुभाष जेजुरकर हे मोटार चालु करण्यासाठी गेले असता त्यांनी विहिरीत पाहताच बिबट्या मृत (Leopard Death) अवस्थेत आढळून आला.
या प्रकाराची माहिती त्यांनी वनविभागाचे (Forest Department) साखरे यांना दिली. साखरे यांनी घटनास्थळी भेट दिली. आजुबाजुच्या रहिवाशांच्या मदतीने मृत बिबट्यास विहिरीतून बाहेर काढले. तो 4 ते 5 महिन्याचा नर बिबट्या (Male Leopard) होता. भक्ष्याचा पाटलाग करताना विहिरीत पडला असावा असे साखरे यांनी सांगितले. विहिरीजवळच या बिबट्याचा वनविभागाने (Forest Department) अंत्यविधी केला.