विहिरीत पडून शेतकर्‍याचा मृत्यू

विहिरीत पडून शेतकर्‍याचा मृत्यू

कुंभारी |वार्ताहर| Kumbhari

कोपरगाव तालुक्यातील कुंभारी ग्रामपंचायत हद्दीत रहिवासी शेतकरी सोमनाथ महादू घुले (वय 55) यांचा विहिरीच्या पाण्यात बुडून मुत्यू झाला. याप्रकरणी कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले असता वैद्यकीय अधिकार्‍यांनी त्यांना मृत घोषित केले आहे.

शेतकरी सोमनाथ घुले यांची शेती गावाच्या दक्षिणेस साधारण दोन किमी अंतरावर आहे. त्यांचा शेतीचा व्यवसाय आहे. त्यांनी आपल्या शेतीसाठी विहीर खोदाईचे काम मजुरांना दिले होते. शनिवार दि. 17 जून रोजी आपल्या विहिरीचे काम पाहण्यासाठी गेले असता वार्‍याच्या झोताने त्यांचा तोल गेला असल्याची माहिती मिळाली आहे.

त्या दुर्घटनेत त्यांचा विहिरीत पडून मृत्यू झाला आहे.त्यांना तेथील मजूर आणि नजिकच्या ग्रामस्थांनी उपचारार्थ कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता तेथील वैद्यकीय अधिकार्‍यांनी त्यांना मृत घोषित केले. दरम्यान या प्रकरणाने कुंभारी, धारणगाव परिसरासह सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, एक मुलगी आणि भाऊ असा परिवार आहे.

याप्रकरणी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात वैद्यकीय अधिकार्‍यांनी आपला वैद्यकीय अहवाल पाठवला असून याप्रकरणी पोलिसांनी अकस्मात मृत्यू दप्तरी क्र.-41/2013 सी.आर.पी.सी.184 अन्वये नोंद केली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक व्ही. एन. कोकाटे करीत आहेत.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com