गोठ्याजवळील विहीर ढासळली पशुधन बालंबाल बचावले

गोठ्याजवळील विहीर ढासळली पशुधन बालंबाल बचावले

खंडाळा |वार्ताहर| Khandala

श्रीरामपूर तालुक्यातील खंडाळा येथे झालेल्या पावसाने कांदा चाळ आणि गाईंच्या गोठ्यानजीक असलेली जुनी विहीर ढासळली.

नानासाहेब मुरलीधर सदाफळ या शेतकर्‍याची घरापासून काही अंतरावर गट नं. 139 मध्ये जून्या पद्धतीचे बांधकाम असलेली विहीर आहे. त्या विहिरीजवळच कांद्याचे शेड आणि जनावरांचा गोठा आहे. विहिरीचा काही भाग ढासळल्यामुळे पुढील संभाव्य धोका टळला, अन्यथा पशुधनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असते. या घटनेचा कामगार तलाठी श्री. सूर्यवंशी यांनी पंचासमक्ष पंचनामा केला.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com