विकएंडला घराबाहेर पडू नका

जिल्हाधिकार्‍यांकडून कडक कारवाईचे आदेश
विकएंडला घराबाहेर पडू नका

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

जिल्ह्यात (District) काही भागात करोना रुग्णसंख्या वेगाने वाढत असल्याचे दिसत आहे. विशेषता शनिवार-रविवार या सुट्ट्यांच्या दिवशी नागरिक पर्यटनासाठी बाहेर पडत आहेत. आठवड्याच्या शेवटच्या दोन्हीही दिवशी जिल्हयात अत्यावश्यक सेवा वगळता इतरांसाठी प्रतिबंधात्मक आदेश लागू आहेत. त्याचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजेन्द्र भोसले (Collector Rajendra Bhosale) यांनी केले आहे. तालुकास्तरीय यंत्रणांनी नियमांचे उल्लंघन करणार्‍या व्यक्ती आणि आस्थापनांविरुद्ध कडक कारवाई करण्याचे आदेश (Order) त्यांनी दिले आहेत.

करोनाच्या संभाव्य तिसर्‍या लाटेच्या अनुषंगाने करावयाच्या कार्यवाहीसंदर्भात तालुकास्तरावरुन कऱण्यात येत असलेल्या उपाययोजनांचा आढावा जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी घेतला. निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित, उपजिल्हाधिकारी रोहिणी नर्‍हे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुनील पोखऱणा, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी डॉ. विरेंद्र बडदे आदी जिल्हा मुख्यालय येथून तर उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, मुख्याधिकारी हे तालुका स्तरावर उपस्थित होते.

यावेळी जिल्हाधिकारी डॉ. भोसले म्हणाले, काही तालुक्यात करोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढताना दिसत आहे. त्यामुळे या तालुक्यांतील रुग्ण संख्या आढळून आलेल्या गावांमध्ये तातडीने आरोग्य पथकांमार्फत सर्वेक्षण (Surveys by health teams) करुन लक्षणे आढळणार्‍या रुग्णांची चाचणी करण्याची आवश्यकता आहे. सार्वजनिक ठिकाणी गर्दी करणे, सार्वजनिक ठिकाणी मास्क न वापरणे असे प्रकार आढळल्यास तात्काळ कार्यवाही करण्याचे निर्देश त्यांनी दिले. विशेषता गावांमध्ये ही रुग्णसंख्या वाढताना दिसून येत आहे. ही चिंतेची बाब आहे. गावपातळीवर स्थापन करण्यात आलेल्या पथकांनी तसेच तलाठी, ग्रामविकास अधिकारी, पोलीस पाटील, सरपंच आणि इतर पदाधिकारी यांनी गावात कोरोना संसर्ग वाढणार नाही, याची दक्षता घेतली पाहिजे. गर्दी जमवणारे कोणतेही कार्यक्रम होता कामा नयेत, असे त्यांनी स्पष्ट केले.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com