विकेंड लॉकडाऊन काळात दुकान उघडे ठेवले

भाजपा शहराध्यक्षांविरुध्द गुन्हा दाखल
विकेंड लॉकडाऊन काळात दुकान उघडे ठेवले
विकेंड लॉकडाऊन (File Photo)

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

करोना संसर्गाच्या (Covid 19 Contagion) पार्श्वभूमीवर जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशान्वये (Collector Order) विकेंड लॉकडाऊन (Weekend lockdown) घोषित करण्यात आलेले असताना श्रीरामपूर (Shrirampur) शहरात या काळात दुकान उघडे ठेवले म्हणून भाजपा शहराध्यक्षांविरुध्द गुन्हा दाखल (BJP city president files case against) करण्यात आला आहे.

करोना संसर्ग तिसरी लाटेचा (Corona infection third wave) सामना करण्यासाठी राज्य शासनाने पुन्हा तिसर्‍या टप्प्यात शनिवार, रविवार विकेंड लॉकडाऊन जाहीर (Saturday, Sunday Weekend Lockdown Announced) केला असून तर सोमवार ते शुक्रवार या दरम्यान सकाळी 7 ते दु. 4 वाजेपर्यंत व्यावसायिकांची दुकाने उघडे ठेवण्याचे आदेश आहेत. नगर जिल्ह्यातही जिल्हाधिकार्‍यांनी दिलेल्या आदेशानुसार नियम पाळले जात होते. मात्र काल शनिवारी विकेंड लॉकडाऊन असतानाही काल भाजपाचे शहराध्यक्ष मारुती बिंगले यांनी त्यांचे ग्लासचे दुकान उघडे ठेवले होते.

काल श्रीरामपूर शहर पोलीस गस्त घालत असताना त्यांना दुकान उघडे (Shop Open) ठेवलेले दिसले. त्यावर श्रीरामपूर शहर पोलिसांनी अचानक जाऊन कारवाई (Police action) केली. याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात मारुती विजय बिंगले यांचेविरुध्द गुन्हा रजिसटर नंण 449/2021 प्रमाणे भादंवि कलम 188 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाजपा शहराध्यक्षांनी दुकान उघडे ठेवले म्हणून एकच चर्चा सुरू होती.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com