८९ विवाह मुहूर्त, यंदा कर्तव्य असणाऱ्यांना खुशखबर

८९ विवाह मुहूर्त, यंदा कर्तव्य असणाऱ्यांना खुशखबर

धामोरी (वार्ताहर)

दोन गत वर्षांपासून करोनामुळे सामूहिक कार्यक्रमोवर निर्बंध होते. त्यामुळे मंगल कार्यालय, आचारी, सजावट, बँडपथक यांना मोठा फटका बसला, त्यामुळे त्यांची आर्थिक हानी होऊन उपासमारीची वेळ आली होती. मात्र यावर्षी करोना परिस्थिती निवळली आहे. राज्यसरकारने राज्य निर्बंधमुक्त केले आहे. त्यातच आनंददायी बाब अशी की या नववर्षात ८९ विवाह मुहूर्त आहेत त्यामुळे यंदा कर्तव्य असणारे तसेच लग्न समारंभातील घटकांना ही खुशखबर आहे.

गुढीपाडव्यापासून सुरू झालेल्या नववर्षात (२०२२ ते २०२३) यंदा विवाहाचे ८९ मुहूर्त असून, त्यात शुद्ध शास्त्रानुसार ६२, तर चातुर्मास काळातील आपत्कालीन, असे २७ मुहूर्त काढण्यात आले आहेत. भारतीय प्राचीन आश्रम व्यवस्थेतील पहिल्या ब्रह्मचर्य आश्रमात (विद्यार्थी दशा) प्रवेश करताना करावा लागणारा उपनयन (मुंज) संस्कार महत्त्वाचा मानला जातो. या संस्काराचे एकूण ४७ मुहूर्त असून, २२ मुहूर्त हे शुद्ध शास्त्रीय, तर २५ मुहूर्त हे आपत्कालीन असल्याचे ज्योतिषाचार्य डॉ. अनिल वैद्य यांनी सांगितले.

८९ विवाह मुहूर्त, यंदा कर्तव्य असणाऱ्यांना खुशखबर
बॉलिवूडमध्ये लग्नाचा सिझन.. रणबीर-आलिया लवकरच अडकणार लग्नबंधनात, तारीख ठरली?

शुद्ध शास्त्रानुसार योग्य विवाह मुहूर्त :

चैत्र ते आषाढ (२०२२) : एप्रिल - १५, १७, २१, २४, २५ (पाच दिवस), मे - ४, १०, १३, १४, १६, १८, २०, २१, २२, २५, २६, २७ (१२ दिवस), जून १, ६, ८, १०, १३, १४, १४, १६, १८ (नऊ दिवस), जुलै ३, ५, ६, ७, ८, ९ (सहा दिवस), मार्गशीर्ष ते फाल्गुन: (तुळशी विवाहानंतर २०२२-२३) नोव्हेंबर २५, २६, २८, २९ (चार दिवस), डिसेंबर २, ४, ८, ९, १४, १६, १७, १८ (आठ दिवस), जानेवारी १८, २६, २७, ३१ (चार दिवस), फेब्रुवारी - ६, ७, १०, ११, १४, १६, २३, २४, २७, २८ (१० दिवस), मार्च - ९, १३, १७, १८ (चार दिवस), चातुर्मासातील आपत्कालीन विवाह मुहूर्त :- आषाढ ते कार्तिक (२०२२) - जुलै १४, १५, - ३१ (तीन दिवस), ऑगस्ट - ३, ४, ७, ९, १०, १५, १६, २०, २१, २९ (१० दिवस), सप्टेंबर – ७, ८, २७, ३० (चार दिवस), ऑक्टोबर ६, ९, १०, ११, २१, ३१ (सहा दिवस), नोव्हेंबर - ५, ६, १०, १७ (चार दिवस)

८९ विवाह मुहूर्त, यंदा कर्तव्य असणाऱ्यांना खुशखबर
Amruta Khanvilkar : 'अप्सरा हो तुम, या कोई परी'! अमृताचं निळ्या साडीतील भुरळ घालणारं सौंदर्य

गौणकाळातील व चातुर्मास काळातील मुहूर्त (२०२२) :

जुलै १, ४, १५, १८ (चार दिवस), ऑगस्ट ३, ७, १४, १६, २९ (पाच दिवस), सप्टेंबर ६, २७, ३० (तीन दिवस), ऑक्टोबर - ५, ११, ३० (तीन दिवस), नोव्हेंब - (चार दिवस), डिसेंबर ३, १३, १४, २८ २, ४, २७ (तीन दिवस), जानेवारी १, ९, १२ (तीन दिवस), उपनयन संस्कार मुख्य काळातील मुहूर्त (२०२२-२३) एप्रिल ३, ६, ११, १३, २१ (पाच दिवस), मे ५, ६, ११, १८, २० (पाच दिवस), जून १, ६, १६ (तीन दिवस), जानेवारी - १ २६, ३१ (दोन दिवस), फेब्रुवारी ८, १०, २२, २४ (चार दिवस), मार्च - १, ३, ९ (तीन दिवस) असे आगामी वर्षात तब्बल ८९ विवाह मुहूर्त असणार आहेत.

८९ विवाह मुहूर्त, यंदा कर्तव्य असणाऱ्यांना खुशखबर
Prarthana Behere : पांढऱ्या नक्षीदार साडीतला 'प्रार्थना'चा मोहक लूक, पहा फोटो
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com