लग्न समारंभात चोरी करणारी आंतरराज्य टोळी जेरबंद

एलसीबीची कामगिरी || दीड लाखांचा मुद्देमाल हस्तगत
लग्न समारंभात चोरी करणारी आंतरराज्य टोळी जेरबंद

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

नगर शहरातील लग्न समारंभातुन (Wedding Ceremony) रोख रक्कम व मोबाईलची चोरी (Mobile Theft) करणारी आंतरराज्य टोळी जेरबंद (Interstate Gang Arrested) करण्यात येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या (एलसीबी) (LCB) पथकाला यश आले आहे. या टोळीकडून एक लाख 44 हजार रूपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

लग्न समारंभात चोरी करणारी आंतरराज्य टोळी जेरबंद
प्रवरासंगम येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत एकाचा मृत्यू

प्रदीप कालुसिंग दपानी (वय 24 रा. कडीयासासी, ता. पचोर, जि. राजगड, मध्यप्रदेश), अमित पन्नासिंग सासी (वय 19 रा. लक्ष्मीपुरा ता. गोगर, जि. बारहा, राजस्थान) अशी जेरबंद केलेल्या चोरट्यांची नावे आहेत. यमुना रघुनाथ लांडगे (वय 75 रा. लांडगेमळा ता. नगर) या 12 मे रोजी मनमाड रोडवरील बंधन लॉन येथे लग्न समारंभात असताना दोन लाख 10 हजार रूपये किंमतीचा ऐवज असलेली त्यांच्याकडील पर्स अज्ञात चोरट्यांनी चोरली होती.

लग्न समारंभात चोरी करणारी आंतरराज्य टोळी जेरबंद
राहुल जगतापांनी गद्दारी केली!

या प्रकरणी लांडगे यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात (Topkhana Police Station) फिर्याद दिली होती. सदर चोरीची (Theft) घटना घडल्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला (SP Rakesh Ola), स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर (LCB PI Dinesh Aher) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार मनोज गोसावी, दत्तात्रय गव्हाणे, संदीप पवार, देवेंद्र शेलार, रवींद्र कर्डीले, संतोष खैरे, रोहित मिसाळ, रणजीत जाधव, आकाश काळे, अमृत आढाव, मेघराज कोल्हे, प्रशांत राठोड, फुरकान शेख, संभाजी कोतकर यांचे पथक समांतर तपास करीत होते.

लग्न समारंभात चोरी करणारी आंतरराज्य टोळी जेरबंद
30 सप्टेंबरनंतर दोन हजारांच्या नोटा दानपेटीत टाकू नका

सदरच्या गुन्ह्यातील चोरटे हे मध्यप्रदेश (Madhya Pradesh) पासींगच्या दुचाकीवरून पुणे (Pune) येथून नगर जिल्ह्याकडे येत आहेत, अशी माहिती निरीक्षक आहेर यांना मिळाली होती. निरीक्षक आहेर यांनी पथकास पंचांना सोबत घेवुन खात्री करून कारवाई करण्याबाबत आदेश दिले. नमुद आदेशाप्रमाणे पथकाने सुपा टोल नाका (Supa Toll Booth) परिसरात सापळा लावुन थांबलेले असताना नगरचे दिशेने बातमीतील वर्णनाप्रमाणे दुचाकीवर आलेल्या दोघांना पकडले. त्यांची पंचासमक्ष अंगझडती घेतली असता 80 हजार रूपये रोख रक्कम व दोन मोबाईल फोन मिळुन आल्याने रोख रकमेबाबत विचारपुस केली असता त्यांनी सदरची रक्कम ही नगर शहरातील बंधन लॉन्स येथील लग्न समारंभामध्ये चोरी केले असल्याबाबत सांगितले.

लग्न समारंभात चोरी करणारी आंतरराज्य टोळी जेरबंद
शेतात काम करत असलेल्या तरुण शेतकर्‍याचा तीव्र उन्हामुळे मृत्यू

रक्कम बँक खात्यात पाठवली

चोरट्यांनी 80 हजार रूपये रोख रक्कम व दोन मोबाईल काढून दिले असले तरी चोरीला गेलेल्या उर्वरीत रकमेबाबत त्यांच्याकडे विचारपुस केली असता त्यांनी एक लाख रूपये वसंत कुमार (पुर्ण नाव माहित नाही, रा. कडीयासासी, ता. पचोर, जि. राजगड, मध्यप्रदेश) व कालुसिंह (पुर्ण नाव माहित नाही, रा. लक्ष्मीपुरा, राजस्थान) यांच्या बँक खात्यामध्ये पाठविले असल्याचे सांगितले. तसेच गुन्ह्यातील चोरी केलेले मोबाईल हे फेकुन दिल्याची कबूली त्यांनी दिली. त्यांच्या इतर साथीदाराबाबत विचारपुस करता त्यांनी साथीदार भुपेद्रसिंह अर्जुनसिंह भानेरीया (रा. कडीयासासी, मध्यप्रदेश) याच्या सोबत गुन्हा केल्याची कबुली दिली आहे.

लग्न समारंभात चोरी करणारी आंतरराज्य टोळी जेरबंद
नदी पात्राची मूळ रुंदी, नदीची हद्द निश्चित करण्याचे काम मनपाचे
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com