वटकणावरून वाद विकोपाला !

वटकणावरून वाद विकोपाला !

कर्जत |प्रतिनिधी| Karjat

लग्न समारंभ आटोपल्यानंतर नववधू आणि वर यांना जेवायला घातले जाते. यावेळी नवरदेवाच्या ताटाला वधूपक्षाकडून वटकण लावण्याची प्रथा आहे. नांदगावात झालेल्या एका लग्नात मात्र, या वटकणावरून वाद झाला अन् मुलीची पाठवणी झालीच नाही.

सिद्धटेकचा वर नांदगाव येथील मुलीशी विवाहबद्ध झाला. कन्येला पाठवणीच्या पूर्वी वधूवरांना जेऊ घालण्याचा कार्यक्रम सुरू झाला. प्रथेप्रमाणे वधूपक्षाकडून 200 रुपये वटकण म्हणून ताटाला लावण्यात आले आणि तेथेच वाद पेटला. वर पक्षाकडून वाढीव पैशाची मागणी वधूपक्षाने अमान्य केली.

त्यावरून शाब्दीक चकमक घडली आणि वाद विकोपाला गेला. पित्याने वधूला पाठविण्यास नकार दिला. त्यानंतर वरपक्ष पोलीस ठाण्यात गेले. पोलीस लग्नस्थळी आल्यानंतरही मुलीला सासरी न पाठवण्यावर वधूपक्ष ठाम राहिला.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com