विवाह सोहळ्यातून पाच तोळ्याचे गंठण लांबविले

संभाजीनगर लॉनमधील घटना || पोलिसात गुन्हा
विवाह सोहळ्यातून पाच तोळ्याचे गंठण लांबविले

अहमदनगर |प्रतिनिधी|Ahmednagar

छत्रपती संभाजीनगर रस्त्यावरील (Chhatrapati Sambhajinagar Road) सिटी लॉनमध्ये असलेल्या लग्न सोहळ्यातून (Wedding Ceremonies) एका महिलेचे पाच तोळ्याचे सोन्याचे गंठण व अडीच हजार रूपयाची रक्कम असा ऐवज चोरीला (Gold Jewelry Theft) गेला. रविवारी (दि. 3) दुपारी ही घटना घडली असून याप्रकरणी रात्री उशिरा तोफखाना पोलीस ठाण्यात (Topkhana Police Station) गुन्हा दाखल झाला आहे. मिना सुभाष साळुंके (वय 55 रा. शिवाजीनगर, नाशिक) यांनी फिर्याद दिली आहे.

विवाह सोहळ्यातून पाच तोळ्याचे गंठण लांबविले
गोदावरी पाण्याच्या आवर्तनाचे अधिकार्‍यांनी सुयोग्य नियोजन करावे

साळुंके यांच्या भाचीचा सिटी लॉन येथे विवाह (Wedding) असल्याने त्या कुटुंबासह तेथे आल्या होत्या. त्यांनी सकाळी सव्वा अकराच्या सुमारास त्यांच्या गळ्यातील पाच तोळ्याचे गंठण व अडीच हजार रूपये त्यांच्याकडील पर्समध्ये ठेवले होते व ती पर्स वधू कक्षातील बेडवर ठेवली होती. साळुंके यांनी काही वेळाने ती पर्स (Pers) मुलीकडे व नंतर पुन्हा भाच्याकडे दिली होती.

विवाह सोहळ्यातून पाच तोळ्याचे गंठण लांबविले
जिल्हा शिक्षक पुरस्कार जाहीर

दरम्यान, साळुंके यांनी सायंकाळी साडे पाच वाजता पर्समधील गंठण व पैसे पाहिले असता त्यांना ते मिळून आले नाही. त्यांनी गंठण व पैशाचा शोध घेतला असता ते सापडले नाही. गंठण व पैसे चोरी गेल्याचे लक्ष्यात येताच साळुंके यांनी तोफखाना पोलिसांना (Topkhana Police) माहिती दिली. पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद झाली असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.

विवाह सोहळ्यातून पाच तोळ्याचे गंठण लांबविले
अकोले, राहुरी, नगर आणि कर्जतमध्ये दूध प्रकल्पांची तपासणी
   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com