मुळा उजवा कालवा फुटला

लाखो लीटर पाणी वाया; पिकांचेही झाले नुकसान
मुळा उजवा कालवा फुटला

नेवासा l तालुका प्रतिनिधी

तालुक्यातील देवगाव येथे निकम वस्ती जवळ मुळा उजवा कालवा फुटल्याने लाखो लीटर पाणी वाया जाऊन शेतकऱ्यांच्या पिकांचेही मोठे झाले नुकसान झाल्याची घटना आज पहाटे घडली.

याबाबद माहिती अशी की, भेंडा-कुकाणा व इतर सहा गावांच्या नळपाणी पुरवठा योजनेसाठी मुळा उजव्या कालव्यातून काल (दि.14) रोजी मुळा धरणातून पाणी सोडण्यात आले होते. हे पाणी भेंडा येथील साठवण तलावात पर्यंत आले.

कालव्यातून साठवण तलावात पाणी भरण्याचे काम सुरू होते. मात्र तलाव भरण्यापूर्वीच तलावाच्या 2/3 किमी आंतरवर देवगाव शिवारात ज्ञानेश्वर कारखान्याचे माजी संचालक रावसाहेब निकम यांचे वस्ती जवळ शुक्रवारी (दि.15) पहाटे मुळा उजवा कालवा फुटला.

कालव्यातील लाखो लिटर पाणी वाया गेल्याने ओढ्याला पूर सदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. पाण्याचा लोंढा पिकातून गेल्याने शेतकऱ्यांच्या पिकांचे ही मोठे नुकसान झाले आहे. कालवा फुटल्याची माहिती मिळताच पाटबंधारे विभागने धरणाकडून येणारे पाणी तत्काळ बंद केल्याची माहिती आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com