नागरिकांना घरकुलाचा लाभ मिळवनू देऊ : आ. काळे
सार्वमत

नागरिकांना घरकुलाचा लाभ मिळवनू देऊ : आ. काळे

पंचायत समिती व शेती महामंडळाच्या अधिकार्‍यांची एकत्रित बैठक

Dhananjay Shinde

Dhananjay Shinde

कोपरगाव (प्रतिनिधी) -

कोपरगाव विधानसभा मतदार संघातील अनेक नागरिकांना घरकुल मंजूर असून देखील स्वत:ची जागा नसल्यामुळे

हे नागरिक घरकुलापासून वंचित राहत आहेत. अशा नागरिकांना घरकुलाचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आमदार आशुतोष काळे यांनी म्हटले आहे.

आ.आशुतोष काळे यांनी पंचायत समिती व शेती महामंडळाच्या अधिकार्‍यांची एकत्रित बैठक घेतली.

या बैठकीत पंचायत समिती व शेती महामंडळाच्या अधिकार्‍यांना त्यांनी मार्गदर्शन केले. ते म्हणाले, मतदारसंघातील संवत्सर गावातील शेती महामंडळाच्या जागेवर मागील काही वर्षांपासून अनेक कुटुंब राहत असून यामध्ये काही शेती महामंडळाचे कामगार देखील आहेत. यामध्ये लक्ष्मणवाडी 278, रामवाडी 178, भरतवाडी 289, दशरथवाडी 224, हनुमानवाडी 138 आदी ठिकाणी शेती महामंडळाचे कामगार राहत आहेत.

या कामगारांना घरकुलासाठी जागा मिळाव्या यासाठी आ. काळे यांच्या सूचनेनुसार सर्व्हे करण्यात आला असून शेती महामंडळाच्या कामगारांना जमिनी देण्याबाबत तातडीने निर्णय घेतला जाणार आहे. त्यामुळे तसेच जे कामगार मयत झाले आहेत अशा कामगारांच्या वारसांना देखील घरकुलासाठी शेती महामंडळाची जागा मिळावी यासाठी प्रस्ताव तयार करून जिल्हाधिकार्‍यांकडे पाठवा अशा सूचना शेती महामंडळाच्या अधिकार्‍यांना दिल्या. जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठपुरावा करून लवकरात लवकर जागा मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.

अनेक गावांतील गावठाण जागा संपुष्टात आल्या आहेत व त्या गावातील शाळा, पाणीपुरवठा योजना, स्मशानभूमी आदी मुलभूत सुविधांसाठी जागा उपलब्ध नाहीत अशा गावांतील गावठाण विस्तारीकरणाचे प्रस्ताव करण्याच्या सूचना आमदार आशुतोष काळे यांनी गटविकास अधिकारी सचिन सूर्यवंशी यांना दिल्या. याबाबत ग्रामविकास मंत्र्यांकडे आपण पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले.

यावेळी सभापती पौर्णिमाताई जगधने, उपसभापती अर्जुनराव काळे, जि. प. सदस्या सोनाली साबळे, काळे कारखान्याचे उपाध्यक्ष सुधाकर रोहोम, संचालक बाळासाहेब बारहाते, गटविकासअधिकारी सचिन सूर्यवंशी, उपअभियंता उत्तम पवार, कृषी अधिकारी पंडितराव वाघिरे, शेती महामंडळाचे जनार्दन डोंगरे, शिरीष लोहकणे, इरिगेशन विभागाचे दिघे , तुषार बारहाते, सूनिल कुहिले आदी उपस्थित होते.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com